NCERT
National council of Educational Research and Training
NCERT ही संस्था आपल्या भारत देशातील शिक्षण क्षेत्रात काम करणारी प्रमुख संस्था आहे. ही संस्था केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्व धोरण संदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करते. निरनिराळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) याविषयी प्रश्न विचारले जातात. सध्या सुरू असलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत.
NCERT Full Form- National council of Educational Research and Training
NCERT मराठी नाव - राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद
NCERT ची स्थापना - 1 सप्टेंबर 1961
NCERT ची संरचना
1) सर्वसाधारण परिषद:
शिक्षण मंत्रालयाचे (मानव संसाधन विकास मंत्री) केंद्रीय मंत्री हे सर्व साधारण परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. शिक्षण मंत्रालयाचे (मानव संसाधन विकास मंत्री) राज्यमंत्री हे उपाध्यक्ष असतात. परिषदेच्या सदस्यांमध्ये राज्यांचे शिक्षण मंत्री, यूजीसी चे अध्यक्ष, विद्यापीठांचे कुलगुरू, एनसीईआरटी चे संचालक त्याचबरोबर बारा शिक्षण तज्ञांची नियुक्ती केंद्र शासनाकडून केली जाते.
शैक्षणिक धोरणांची आखणी करण्याचे महत्त्वाचे काम या परिषदेमार्फत केले जाते.
2) कार्यकारी समिती:
कार्यकारी समितीचे अध्यक्षही केंद्रीय शिक्षण मंत्री (मानव संसाधन विकास मंत्री) असतात व उपाध्यक्ष केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री असतात. एनसीईआरटीच्या विविध विभागांचे कार्य व्यवस्थितपणे चालवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय कार्यकारी समितीकडून घेतले जातात. कार्यकारी समितीला सहाय्य करण्यासाठी
- अर्थ समिती
- स्थापना समिती
- कार्यक्रम समिती
असतात.
NCERT चे विभाग
- पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षण विभाग
- अभ्यासक्रम विकसन (निर्मिती) विभाग
- विज्ञान व गणित विभाग
- शिक्षक प्रशिक्षण विभाग
- सर्व समावेशक शिक्षण विभाग
- शैक्षणिक तंत्रज्ञान विभाग
- सामाजिक शास्त्र विभाग
- शैक्षणिक सर्वेक्षण व माहिती प्रक्रिया विभाग
- शैक्षणिक व व्यावसायिक शिक्षण विभाग
NCERT मार्फत प्रकाशित होणारी नियतकालके
- Indian Educational Review
- School science
- Prathamik Shikshak
- Bharatiya Adhunik Shiksha
- Journal of Indian Education
- Indian Journal of Educational Technology
0 Comments