Socialize

Cast certificate documents list

Cast certificate documents list 2023 | जातीच्या दाखल्याची आवश्यकता

 नमस्कार मित्रांनो, आपणास आज सर्वच शासकीय कामासाठी जातीचा दाखला Cast Certificate आवश्यक असतो. मुलांच्या शिक्षाणापासून ते नोकरी पर्यंत जातीचा दाखला खूप आवश्यक आहे. या लेखात आपण जातीचा दाखला म्हणजे काय? व दाखला काढण्यासाठी  आवश्यक कागदपत्रांची माहिती पाहणार आहोत.


जातीचा दाखला (Cast Certificate ) म्हणजे काय ?

आपण ज्या जातीचे आहोत ती  जात प्रमाणित करणारा सरकारी दस्तऐवज म्हणजे जातीचा दाखला होय.

जातीच्या दाखल्याची (Cast certificateआवश्यकता

1) जातीचा दाखला सरकारी नोकरीत आरक्षण घेण्यासाठी लागतो.

2) सध्या प्रत्येक मुलाला शिक्षणासाठी जातीचा दाखल्याची आवश्यकता असते.

3) शासकीय निरनिराळ्या योजनाचा लाभ मिळवण्यासाठी

4) जातीचा दाखला काहीवेळा सरकारी नोकरीत वयोमर्यादेत अतिरिक्त वयाची सूट मिळावी त्याच्यासाठी उपयोगी पडतो.

5) जातीचा दाखला हा शैक्षणिक शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा याच्यासाठी सर्वात जास्त लागत असतो.

6) निवडणूक लढवताना जातीचा दाखला गरजेचा आहे.

अशा विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला (Caste Certificate)  लागत असतो.

जातीचा दाखला कसा काढावा?

                    जातीचा दाखला online पद्धतीने काढला जातो. यासाठी आपण CSC VLE सेंटर, आपले सरकार केंद्र, महा ई सेवा केंद्र याठिकाणी जाऊन कागदपत्र जमा करून दाखला काढू शकतो.

आवश्यक कागदपत्र Cast certificate document list 2022

1) स्वत:चे व वडिलांचे आधारकार्ड ( Aadhaar card ) 

2) स्वतःचा जन्म दाखला ,शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाइट

3) वडिलांचा जन्म किंवा शाळा सोडल्याचा दाखला

4) वडिलांचा पुरावा नसल्यास काकाचा शाळा सोडल्याचा दाखला

5) आजोबांचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला

6) रेशन कार्ड

7) आवश्यक जातीचा सन पुरावा

    SC-1950  पूर्वीचा   

    NT-1963  पूर्वीचा

 OBC-1967 पूर्वीचा                                       

  VJNT-1960 पूर्वीचा 

8)  स्वयंघोषणापत्र

9) ७/१२ उतारा ( महसूल पुरावा )

10) फोटो २

Post a Comment

0 Comments