Socialize

Best health insurance 2023 in marathi

 

Best health insurance 2023 in marathiआरोग्य विमा म्हणजेच health insurance होय. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणसाचे आरोग्य ढासळत चालले आहे. आपल्या busy वेळापत्रकामुळे आरोग्याकडे लक्ष देणे दिवसे दिवस कठीण होत आहे. तसेच रासायनिक खतांचा अतिवापर, कीटकनानाशकांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर यामुळे आरोग्याच्या नवीन समस्या वाढत आहेत. वैद्यकीय खर्चामध्ये झालेली मोठी वाढ व वाढते ताण तणाव या सर्वामुळे health insurance ची खूप गरज निर्माण झाली आहे. आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नियमितपणे व्यायाम, योगासने, ध्यान यांची सुद्धा आवश्यकता आहे.

आरोग्य विमा का घ्यावा? | Why take health insurance?

कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आजारी पडल्यास त्या संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडते. त्याची सर्वात मोठी काळजी असते ती पैशांची. दवाखान्याचे बिल किती होईल? इतकी रक्कम कुठून आणायची? असे अनेक प्रश्न सर्वांच्या मनामध्ये असतात. मागील महामारीच्या काळात तर बरेच जण या काळजीमुळे मृत्युमुखी पडल्याचे आपणास पहावयास मिळते.

भविष्यात कुटुंबातील कोणीही व्यक्ती दवाखान्यात ऍडमिट झाल्यास मोठा खर्च येऊ शकतो. यासाठी आपल्या सर्वांकडे एक आरोग्य विमा असणे आवश्यक आहे. भविष्यात कोणी आजारी पडल्यास येणाऱ्या खर्चाची चिंता कुटुंबासाठी राहणार नाही व दवाखान्यात असताना कोणतीही काळजी राहणार नाही. म्हणून सर्वांनी आरोग्य विमा अवश्य काढावा.


आरोग्य विमा म्हणजे काय? What is health Insurance?

ज्याप्रमाणे Term Life Insurance मध्ये विमित व्यक्तीच्या मृत्यूनंतर वारसाला विमा रक्कम देऊन कुटुंबाचे आर्थिक नुकसान कमी करतो; तसेच आरोग्य विमा हा आपला वैद्यकीय खर्च भरण्याची हमी घेतो. आरोग्य विमा कुटुंबातील विविध व्यक्ती काही कारणाने दवाखान्यात उपचारासाठी शस्त्रक्रियेसाठी ॲडमिट झाल्यास दवाखान्याचा होणारा सर्व खर्च विमा कंपनी करते. त्याबदल्यात आपल्याला दरवर्षी ठराविक रक्कम विमा हप्ता म्हणून भरावी लागते. म्हणजेच आरोग्य विमा म्हणजे ठराविक रकमेच्या बदल्यात आपल्या भविष्यात होणाऱ्या वैद्यकीय खर्च करण्याची जोखीम विमा कंपनीकडे देणे होईल.

वैयक्तिक विमा व फॅमिली फ्लोटर (family floater)म्हणजे काय?

आरोग्य विमा आपणास दोन प्रकारे घेता येतो.

1)वैयक्तिक विमा व

2)कुटुंब विमा

वैयक्तिक विमा हा कुटुंबातील एका व्यक्तीसाठी असतो. त्या विमा घेतलेल्या व्यक्तीला विमा संरक्षण मिळते. यामध्ये त्याला वैयक्तिक वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात ऍडमिट केल्यास त्याचा संपूर्ण खर्च विमा कंपनी देते; पण दुसर्‍या सदस्यांना यामध्ये कव्हर नसतो. त्यांच्यासाठी दुसरा त्यांचा वैयक्तिक विमा घ्यावा लागतो.

फॅमिली फ्लोटर (family floater) मध्ये कुटुंबातील जेवढ्या व्यक्तींसाठी विमा घेतलेला असून या सर्वांना विमा संरक्षण एकाच विमा हप्त्यात दिले जाते. यामध्ये पती पत्नी मुले यांचा समावेश असतो. यामध्ये आई-वडिलांना समावेश करता येतो. मात्र यामुळे प्रीमियम जास्त बसते. आरोग्य विम्याचा प्रिमियम घरातील सर्वात मोठ्या सदस्याच्या वयावर अवलंबून असतो. त्यामुळे जास्त वय असलेल्या व्यक्तींसाठी स्वतंत्र विमा खरेदी करणे फायदेशीर ठरते. थोडक्‍यत वैयक्तिक विमा प्रकारात फक्त एका व्यक्तीसाठी विमा संरक्षण असते. सर्वांसाठी विमा घ्यायचा झाल्यास प्रत्येकासाठी स्वतंत्र विमा खरेदी करावा लागतो. या उलट (family floater) मध्ये आपण कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी एकाच विमा हप्त्यात विमा संरक्षण घेऊ शकतो.

आर्थिक नियोजनातील महत्वाच्या बाबी

किती रकमेचा आरोग्य विमा खरेदी करावा?

विमा रक्कम हे कुटुंबाचे एकूण उत्पन्न, कुटुंबातील सदस्यांची संख्या, कुटुंबातील सदस्यांचे वय, कुटुंबातील सदस्याला यापूर्वी असलेले आजार या सर्वांचा विचार करून आपण आपल्यासाठी योग्य विमा रक्कम ठरवू शकतो.

विमा रकमेच्या जास्तीत जास्त रक्कम एवढा विमा खर्च वैद्यकीय कंपनीमार्फत दिला जातो. विमा रकमेपेक्षा जास्त खर्च झाल्यास हा खर्च विमेदाराला स्वतःला करावा लागतो. तसेच फॅमिली फ्लोटर मध्ये एका वर्षामध्ये एकापेक्षा अधिक व्यक्ती आजारी पडल्यास व प्रथम व्यक्तीस सर्व रक्कम खर्च झाल्यास दुसर्‍या सदस्यांना विमा रक्कम घेता येत नाही. आज असे काही प्लॅन आहेत की ज्यामध्ये रिस्टोर बेनिफिट दिला जातो. म्हणजे एकदा एका व्यक्तीसाठी संपूर्ण रक्कम खर्च केल्यानंतर वर्षातून पुन्हा एकदा ही संपूर्ण रक्कम इतर सदस्यांना वापरता येते. आपण किती विमा घ्यावा हे ठरवत असताना आपण राहत असलेल्या ठिकाणचा व तेथील वैद्यकीय खर्चाचा ही विचार करा

Best Health Insurance खरेदी करताना खालील निकष तपासून पहा.


 1. Claim Settlement Ratio – Best Health Insurance निवडताना सर्वात महत्वाचा निकष म्हणजे Claim Settlement Ratio होय. Claim Settlement Ratio म्हणजे एका वर्षात कंपनीकडे आलेले क्लेम व त्यातील कंपनीने पूर्ण केलेले क्लेम होय. समजा एखाद्या कंपनीकडे १०० क्लेम आले व तिने ९७ लोकांचे क्लेम पास केले. तर त्या कंपनीचा Claim Settlement Ratio ९७% होईल. हा Claim Settlement Ratio जितका अधिक ती कंपनी चांगली.
 2. Incurred Claim Ratio – Incurred Claim Ratio म्हणजे कंपनीने दिलेली क्लेमची रक्कम / कंपनीकडे जमा केलेला हप्ता * १०० याप्रमाणे Ratio काढल्यास तो ७०% ते ९०% असावा.
 3. Cashless सुविधा– आपल्या location मधील कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा आहेत याची माहिती घ्या. आपल्या परिसरातील महत्वाच्या हॉस्पिटल मध्ये ही सुविधा असावी.
 4. Room Rent capping– काही विमा कंपनीच्या पोलीसीमध्ये room भाड्याला लिमिट असते तर काही कंपनीच्या policy मध्ये Room Rent capping नसते. policy घेताना त्याची माहिती घ्या.
 5. Pre and Post Hospitalization – दवाखान्यात दाखल होण्यापूर्वी चा खर्च व दवाखान्यातून discharge दिल्या नंतरचा खर्च किती दिवसापर्यंत कव्हर आहे याची माहिती घ्या.
 6. No Claim Bonus– विमा खरेदी केल्यानंतर आपण कोणताही क्लेम घेताला नाही तर त्यासाठी कंपनीमार्फत No Claim Bonus दिला जातो. तो दर क्लेम न घेतलेल्या वर्षी १०% तो ५०% असतो. जास्तीत जास्त १००% असतो.
 7. Ambulance Charges
 8. One Day Surgery– एका दिवसात होणाऱ्या शस्त्रक्रिया समाविष्ट आहेत का याची खात्री करा.
 9. Free Medical Check up– दरवर्षी कंपनी मार्फत फ्री Medical Check up असल्याची खात्री करा.
 10. Restore Benefit- यामध्ये कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडली व ती व्यक्ती दवाखान्यातील खर्च पूर्ण विमा रक्कम झाला व त्याच वर्षात दुसरी कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडली व तिला ही दवाखान्यात ऍडमिट व्हावे लागले तर पहिल्या व्यक्तीवर संपूर्ण विमा रक्कम खर्च झालेली असते. अशावेळी अनेक विमा पॉलिसी म्हणते रिस्टोअर बेनिफिट ची सुविधा असते. वर्षातून एक वेळा आपल्या विमा रक्कम एवढी रक्कम पुन्हा आपल्या policy मध्ये रिस्टोअर केली जाते. म्हणजेच पाच लाखाचा विमा असेल व कुटुंबातील एका व्यक्तीने पाच लाखाचा क्लेम करून ही रक्कम संपली असली तरी पुन्हा कंपनीमार्फत पाच लाखाचा विमा दिला जातो म्हणजे कुटुंबातील दुसरी एखादी व्यक्ती आजारी पडल्यास कंपनी पुन्हा एकदा पाच लाखापर्यंत देते.
 11. Waiting Period-विमा पॉलिसी घेताना जर एखाद्या व्यक्तीला अगोदरच काही आजार असल्यास या आजारांना या पोलीस मध्ये काही ठराविक वर्षानंतर कव्हर केले जाते हा कालावधी दोन ते चार वर्षे असू शकतो. हा कालावधी कमीत कमी असलेल्या पॉलिसीची निवड करणे फायद्याचे ठरते.

वरील सर्व निकषांची माहिती घेऊन आपली विमा कंपनी निवडा.

Health Insurance Tax Benefits

आयकर कायदा, 1961 च्या कलम 80D अंतर्गत, विमाधारकांना कर कर सवलत मिळते. व्यावसायिक व पगारदार दोघानाही भरलेल्या प्रीमियमवर कर लाभ मिळतो.

Post a Comment

0 Comments