Socialize

Financial Planning 2023

आर्थिक नियोजन 2023(Financial planning)डिसेंबर २०१९ पासून कोविड १९ च्या रूपाने जगात खूप मोठे संकट आले होते. त्यातून सर्व जग आता सावरत आहे. या काळात लोकांना अनेक संकटाचा सामना करावा लागला. त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आर्थिक नियोजनाची आवश्यकता निर्माण झाली. प्रत्याकाच्या आयुष्यामध्ये काही महत्वाच्या आर्थिक बाबी असणे अत्यावशक आहे. आपले आर्थिक नियोजन (Financial planning) असणे खूप गरजेचे झाले आहे. आपल्या आर्थिक नियोजनात खालील 4 गोष्टीना खूप महत्व आहे.

कौटुंबिक सुरक्षितता आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी

  • जीवन विमा (Life Insurance)
  • आरोग्य विमा (Health Insurance)
  • आपत्कालीन निधी  ( Emergency Fund)
  • गुंतवणूक ( Investment)

जीवन विमा (Life Insurance)

  जीवन विमा म्हणजे काही ठराविक रक्कमेच्या बदल्यात विमा कंपनी मार्फत विमेदाराची जोखीम स्वीकारणे होय. कुटुंब प्रमुखासाठी जीवन विमा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक व्यक्ती त्याच्या गरजेनुसार जीवन विमा घेऊ शकतो. यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे जीवन विमा मिळतील, पारंपारिक जीवन विमा ( Traditional Life Insurance) आणि मुदत जीवन विमा (Term Life Insurance). अशा स्थितीत आता मुदतीचा जीवन विमा (Term Life Insurance) घेणे अधिक फायदेशीर आहे; कारण तुम्हाला कमी प्रीमियममध्ये अधिक विमा संरक्षण मिळते.

तुमच्या वार्षिक उत्पन्नावर आधारित तुमचे विमा संरक्षण किती असावे हे तुम्ही ठरवू शकता. कुटुंबातील कमावणारा व्यक्तीचा विमा असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त होते; यासाठी जर त्याचा टर्म इन्शुरन्स (Term Insurance) असेल तर कुटुंबाला खूप फायदा होईल.

आरोग्य विमा (Health Insurance)

   आर्थिक नियोजन 2022(Financial planning 2022) मध्ये टर्म लाइफ इन्शुरन्ससोबतच (Term Life Insurance) कुटुंबातील सर्वांचा आरोग्य विमाही (Health Insurance) असावा. आज आरोग्य विम्याची नितांत गरज आहे. निश्चित प्रीमियम भरून आपण आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो.

आरोग्य विमा असल्यास कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आजारी पडल्यास दवाखान्यातील संपूर्ण खर्च विमा कंपनी करते. आजच्या धावपळीच्या जगात आरोग्य विमा खूप गरजेचा बनला आहे. भारतात अनेक आरोग्य विमा कंपन्या आहेत. याविषयी जाणून घेतल्यास तुम्ही योग्य आरोग्य विमा खरेदी करू शकता. तुमच्या कुटुंबासाठी तुमच्याकडे आरोग्य विमा असणे आवश्यक आहे. कारण सध्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च खूप जास्त आहे. त्यामुळे भविष्यात कोणी आजारी पडल्यास आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. 

आपत्कालीन निधी  ( Emergency Fund)

       आपत्कालीन निधी  ( Emergency Fund) म्हणजे अशी रक्कम कि जी आपल्याला अडचणीच्या वेळेस लगेच उपलब्ध होईल. प्रत्येक कुटुंबासाठी प्रत्येक वेळी आपत्कालीन निधी असणे अत्यंत आवश्यक आहे. कुटुंबात अचानक संकट आल्यावर हा निधी आपल्याला मदत करतो. त्यामुळे तुमच्याकडे नेहमीच ठराविक रक्कम असावी. ते फक्त आपत्कालीन परिस्थितीतच वापरावे. ही रक्कम वेळेत मिळायला हवी. आपत्कालीन निधी  ( Emergency Fund) ही रक्कम सर्वसाधारणपणे आपल्या मासिक खर्चाच्या किमान १० पट असणे आवश्यक आहे. भविष्यात कधी काही कारणामुळे आपले उत्पन्न बंद झाल्यास आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत पणे चालू राहतील. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडवणूक , अडचण होणार नाही. म्हणूनच आपल्या आर्थिक नियोजनामध्ये आपत्कालीन निधी असणे खूप गरजेचे आहे.

गुंतवणूक ( Investment)

    आर्थिक नियोजन 2022(Financial planning 2022) मधील अतिशय महत्वाचा घटक म्हणजे investment होय. तुमच्या उत्पन्नाचा काही भाग गुंतवणे (Invest) फार महत्वाचे आहे. हे पैसे तुमच्या निवृत्तीनंतर, तुमच्या मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न, घर खरेदी, कार खरेदी अशा विविध कामांसाठी वापरले जाऊ शकतात. म्हणून गुंतवणूक हि खूप नियोजनपूर्वक करा.

बरेजजण आपली रक्कम FD अथवा SAVING मध्ये ठेवतात. यावर मिळणारा परतावा हा तुलनेने कमी असतो. बचतीपेक्षा गुंतवणुकीवर तुम्हाला जास्त परतावा मिळतो. यासाठी तुम्हाला तुमच्या वयानुसार गुंतवणुकीचा पर्याय निवडावा लागेल. ही गुंतवणूक डायरेक्ट स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, पीपीएफ, पीएफ, प्रॉपर्टी, गोल्ड, बाँड अशा विविध स्वरूपात करता येते. तुम्ही तुमच्या उद्दिष्टानुसार जास्तीत जास्त कालावधीसाठी ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. गुंतवणुकीचे योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या SEBI नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या.Post a Comment

0 Comments