Socialize

mul sankhya 1 to 100 | १ ते १०० मधील मूळ संख्या

मूळ संख्या 1 ते 100

मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या किती व कोणत्या? 

मूळ संख्या

मूळ संख्या गणितातील एक महत्त्वाचा भाग आहे. या घटकावर आधारित अनेक प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी असतात. यासाठी इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षा असेल, पाचवी स्कॉलरशिप ,आठवी स्कॉलरशिप ,महा टीईटी परीक्षा याचबरोबर एमपीएससी, यूपीएससी यासारख्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये हा एक महत्त्वाचा घटक आहे म्हणून या घटकावर आधारित काही प्रश्न तसेच मूळ संख्या कशा ओळखायच्या, मूळ संख्या म्हणजे काय? याविषयीची माहिती या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत.

मूळ संख्या 

 मूळ संख्या- ज्या संख्यांना फक्त दोनच विभाजक असतात 1 आणि ती स्वतः अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात. मूळ संख्यांना या दोन व्यतिरिक्त एकही अवयव/विभाजक नसतो.


उदा- 11 या संख्येला फक्त एक आणि 11नेच भाग जातो. म्हणून ११ ही मूळ संख्या आहे.

 1 ते 100 मधील मूळ संख्या



                 
गट क्र.
पासून पर्यंत संख्या
संख्या
एकूण संख्या 
1
1 ते 10
  2 ,3 ,5, 7
4
2
11 ते 20
11, 13, 17, 19
4
3
21 ते 30
23, 29
2
4
31  ते 40
31, 37
2
5
41 ते 50
41, 43, 47
3
6
51  ते 60
53 ,59
2
7
61 ते 70
61, 67
2
8
71 ते 80
71,  73, 79
3
9
81 ते 90
83, 89
2
10
91 ते 100
97
1
  

वरील बॉक्समध्ये 1 ते 100  मध्ये असणाऱ्या पंचवीस मूळ संख्या गटनिहाय दिल्या आहेत. यामध्ये 10-10  संख्येचे गट लक्षात राहण्यासाठी केलेले आहेत. सर्वात जास्त मूळ संख्या या पहिल्या दोन गटांमध्ये येतात, म्हणजेच 1 ते 20 मध्ये येतात. या दोन गटात एकूण 8 मूळसंख्या आहेत. फक्त पाचव्या आणि आठव्या गटामध्ये तीन तीन मूळ संख्या आहेत आणि दहाव्या  गटामध्ये फक्त एक मूळ संख्या आहे. उर्वरित सर्व गटांमध्ये प्रत्येकी दोन मूळ संख्या आहेत.

मूळ संख्येबाबत महत्वाचे मुद्दे

  • १ ते १०० मध्ये एकूण  पंचवीस मूळ संख्या आहेत. 
  • 1 ते 50 मध्ये 15 आणि 51 ते 100 मध्ये १० मूळ संख्या असतात. 
  • सर्वात लहान मूळ संख्या २ आहे.
  • २ ही एकमेव सम मूळ संख्या आहे. 
  • उर्वरित २४ मूळ संख्या विषम आहेत. 
  • 1 या संख्येला फक्त एक हा एकच  विभाजक आहे त्यामुळे एक ही संख्या मुळही नाही आणि संयुक्तही नाही.
  • 11 ते 100 मध्ये येणाऱ्या मूळ संख्यांच्या एकक स्थानी 1,3,7,9 यापैकीच एक अंक येतो.
  • दोन अंकी एकूण मूळ संख्या 21 आहेत
  • .एकक स्थानी 1 असणाऱ्या एकूण 5 संख्या आहेत.
  •  एकक स्थानी 3 असणाऱ्या दोन अंकी 5 संख्या आहेत.
  •  एकक स्थानी 7 असणाऱ्या एकूण दोन अंकी 6 संख्या आहेत.
  •  एकक स्थानी 9 असणाऱ्या एकूण 5 संख्या आहेत.

Thanks .

Post a Comment

0 Comments