Socialize

Jodmul Sankhya And Sahmul sankhya | जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या

जोडमूळ संख्या व सहमूळ संख्या 



jodmul sankhya


मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या व सहमूळ संख्या या गणितातील काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत. यापैकी जोड मूळ संख्या आणि  सहमूळ संख्या या दोन संकल्पना विशेष माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. दोन्ही संकल्पना भिन्न आहेत, मात्र यामधील फरक जाणून घेणे महत्वाचे आहे. सहमूळ संख्या आणि जोडमुळ संख्या यामधील फरक लक्षात न आल्यामुळे चुका होण्याची शक्यता असते.

 जोड मूळ संख्या  कशाला म्हणतात?


  जोड मूळ संख्या-  दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असते,  अशा जोडून येणार्‍या दोन मूळ संख्या यांना जोडमूळ संख्या म्हणतात. म्हणजेच जोडमुळ संख्या मध्ये असणाऱ्या दोन्ही संख्या मूळ संख्या असतात. या दोन संख्यांच्या मध्ये फक्त एकच संयुक्त संख्या असते. जोडमूळ संख्या मध्ये दोन संख्यांची जोडी असते.

 1 ते 100 मधील  जोडमूळ संख्या


 3- 5,   5 -7, 11-13, 17-19, 29-31,  41-43, 59-61, 71-73

वैशिष्ट्ये:-

  •  एक ते शंभर मध्ये एकूण आठ जोडमुळ संख्यांच्या जोड्या आहेत.
  •  जोड मूळ संख्या मध्ये दोन्ही संख्या मूळ संख्या असतात.
  •  दोन मूळ संख्या मध्ये फक्त एकच संयुक्त संख्या असते.
  •   जोडमूळ संख्यांना  फक्त एकच सामाईक विभाजक असतो.


 सहमूळ संख्या म्हणजे काय?


  सहमूळ संख्या-  ज्या दोन संख्यांना  फक्त 1 हा एकच सामाईक विभाजक असतो, 1 व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने त्या दोन संख्यांना भाग जात नाही,  अशा संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात.

 उदाहरणात-  13- 20, 4-21, 50-7, 11-17, 91-25, 35-12 


वैशिष्ट्ये:-

  •  एक ते शंभर मध्ये  अनेक सहमूळ संख्या आहेत.

  •  सहमूळ संख्यातील संख्या या मूळ व संयुक्तही असतात.
  • संयुक्त संख्यांची जोडीही सहमूळ संख्या असू शकते. उदाहरणात - 4-21  या जोडीमध्ये 4 व 21 या दोन्ही संख्या संयुक्त संख्या आहेत, मात्र या दोन्ही संख्यांचे सामाईक विभाजक फक्त एक हाच आहे. एक व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने या दोन संख्यांना भाग जात नाही म्हणून यांना सहमूळ संख्या म्हणतात.
  •  दोन मूळ संख्यांची जोडी ही सहमूळ संख्या असतात. उदाहरणात- 11-17
  •   सहमूळ संख्या मध्ये एक मूळ संख्या व संयुक्त संख्या ही असू शकते. 13-20


  अशाप्रकारे  जोड मूळ संख्या आणि सहमूळ संख्या या वेगळ्या संकल्पना आहेत. जोड मूळ संख्या मध्ये जोडीतील  दोन्ही संख्या या मूळ संख्या असतात , तर सहमूळ संख्यांच्या जोडीतील दोन्ही संख्या या मूळ, संयुक्त असू शकतात.  जोड मूळ संख्या यांच्यामध्ये एकच संयुक्त संख्या असते मात्र सहमूळ संख्या मध्ये कितीही संयुक्त याचा मूळ संख्या असू शकतात.

 

धन्यवाद! 



Post a Comment

0 Comments