Socialize

Term Life Insurance

 

Term Life Insurance 2023

टर्म लाइफ इन्शुरन्स म्हणजे काय?

                         टर्म लाईफ इन्शुरन्स (Term Life Insurance)ही एक जीवन विमा योजना आहे. अलीकडील काळात अतिशय लोकप्रिय असणारा आयुर्विमा प्रकार  म्हणजे  टर्म लाईफ इन्शुरन्स (Term Life Insurance) होय. या प्रकारामध्ये आपण जेवढी मुदत ठेवतो तितका काळ तुम्हाला विमा संरक्षण दिले जाते व तेवढा काळ आपल्याला विमा हप्ता भरावा लागतो. टर्म इन्शुरन्स विमाधारकाला कमी प्रीमियममध्ये जास्त रक्कमेचे जीवन संरक्षण प्रदान करतो. घरातील प्रमुख कमावती व्यक्तीचा टर्म लाईफ इन्शुरन्स (Term Life Insurance) असावा. टर्म लाईफ इन्शुरन्स (Term Life Insurance) हा फक्त विमा संरक्षण देतो. मुदतीनंतर कोणत्याही प्रकारचा परतावा मिळत नाही. मुदत काळात काही दुर्घटना झाल्यास विमाधारकाच्या वारसास सर्व रक्कम दिली जाते. त्यामुळे विमेदारचा मृत्यू झाल्यास त्याच्या नंतरही त्याचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम राहण्यास मदत होते.

आर्थिक नियोजनातील महत्वाच्या बाबी

पारंपारिक लाईफ इन्शुरन्स की टर्म लाईफ इन्शुरन्स घ्यावा ?

                             जीवन विम्यामध्ये प्रमुख दोन प्रकारचे जीवन विमा आहेत, पारंपारिक जीवन विमा (Traditional life insurance) आणि मुदत जीवन विमा (Term life insurance.) पारंपारिक जीवन विमा प्रकारात विमा रक्कम जास्त ठेवू शकत नाही कारण यामध्ये विमा हप्ता जास्त असतो. या प्रकारात विमा पॉलिसीची मुदत संपल्यानंतर विमेदार व्यक्ती ला ठराविक रक्कम दिली जाते सर्वसाधारणपणे बोनस व भरलेले रक्कम विमा मुदतीनंतर विमेदाराला  दिली जाते. विमा मुदत कालावधीत  विमेदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास विमा रक्कम व या कालावधीतील बोनस रक्कम दिली जाते. यामध्ये सर्वसाधारणपणे एक लाख रुपये विमा रक्कमेस वार्षिक ५००० ते ७००० रुपये हप्ता बसतो. त्यामुळे मोठ्या रकमेचा विमा घेणे कठीण जाते.
                        याउलट टर्म लाइफ इन्शुरन्स (Term life insurance) मध्ये कमी रकमेमध्ये अधिक विमा संरक्षण मिळते. विमा रक्कम व विमेदार व्यक्तीचे वय, व्यसन यानुसार प्रीमियम आकारला जातो. याठिकाणी  ५० लाखापर्यंतचा विमा वार्षिक ५००० ते ७००० हजाराच्या हप्त्यांमध्ये मिळतो. त्यामुळे या प्रकारात कमी हप्त्यामध्ये आपण आपल्या  कुटुंबांसाठी मोठे संरक्षण घेऊ शकतो.
या विमा प्रकारात विमेदार व्यक्तीचा अकाली मृत्यू  झाल्यास त्याच्या कुटुंबाला म्हणजेच वारसाला पन्नास लाख रुपयाचा विमा रक्कम दिली जाते. मात्र विमा कालावधीत काहीही न होता जीवित राहिला तर सदर व्यक्तीस कोणत्याही प्रकारची रक्कम परत मिळत नाही. अशाप्रकारे पारंपारिक विमा (Traditional life insurance) प्रकार हा कमी विमा संरक्षण व बचत या दृष्टीने घेता येईल तर टर्म इन्शुरन्स (Term Life Insurance) हा विमेदाराचा अकाली मृत्यू झाल्यास त्याचे संपूर्ण कुटुंब आर्थिक दृष्ट्या स्टेबल राहावे यासाठी टर्म इन्शुरन्स आवश्यक आहे.
Term life insurance

टर्म लाईफ इन्शुरन्स किती असावा?

                            टर्म लाइफ इन्शुरन्स विमा संरक्षण हे प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार घेता येईल. विमा कंपनी त्या व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नाच्या आधारावर विमेदारास विम्याची रक्कम देते. म्हणजेच आपले वार्षिक उत्पन्न खूपच कमी असेल तर आपल्याला त्या पट्टीत विमा संरक्षण घेता येईल. सर्वसाधारणपणे आपल्यानंतर आपले कुटुंब सुस्थितीत रहावे, कोणतीही आर्थिक समस्या त्यांच्यासमोर उभी राहू नये म्हणून त्या कुटुंबपमुखाचे विमा संरक्षण हे त्याच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या १०% ते २०% असावे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपये असल्यास त्याचा टर्म लाइफ इन्शुरन्स हा 5000000 ते  १ कोटी या दरम्यानचा असावा.


टर्म लाइफ इन्शुरन्स कसा खरेदी करावा?

                        मुदत योजना विमा (Term Life Insurance) दोन प्रकारे खरेदी करता येतो. तो आपण बँक, विमा प्रतिनिधी यांच्यामार्फत ऑफलाईन घेऊ शकतो. अथवा ऑनलाईन पद्धतीने ही घेऊ शकतो. ऑनलाइन पद्धतीने घेतल्यामुळे आपल्याला विमा हप्ता ऑफलाइनच्या तुलनेमध्ये कमी बसतो.

टर्म लाइफ इन्शुरन्स कोणी घ्यावा?

                        टर्म लाइफ इन्शुरन्स (Term Life Insurance)  हा कुटुंबातील कमावती व्यक्तीच्या नावे असावा. ज्या व्यक्तीच्या जाण्यामुळे आपल्याला खूप आर्थिक नुकसान होऊ शकते अशा व्यक्तीच्या नावे म्हणजेच कुटुंबप्रमुखाच्या नावे टर्म लाइफ इन्शुरन्स असावा.घरात २ कमावत्या व्यक्ती असल्यास त्या दोघांच्या नावे इन्शुरन्स असावा. इतर सदस्यांच्या नावे विमा काढण्याची आवश्यकता नसते. त्यांच्या भविष्याच्या सोयीसाठी आपण इतर इन्वेस्टमेंट करू शकतो. जी पारंपारिक विमा प्रकारापासून मिळणाऱ्या परताव्या पेक्षा अधिक परतावा आपल्याला देऊ शकते.

टर्म लाइफ इन्शुरन्स घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात?

भारतामध्ये आज अनेक कंपन्या टर्म लाइफ इन्शुरन्स विमा सुरक्षा देतात. त्यापैकी कोणती कंपनी निवडावी यासाठी खालील मुद्यांचा विचार विमा खरेदी करण्यापूर्वी आवश्य करावा.

  • सर्वात प्रथम ती कंपनी या विमा क्षेत्रामध्ये किमान पाच वर्षे ते दहा वर्षापूर्वी आलली असावी.
  • विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो (Claims settlement Ratio) हा जास्तीत जास्त असावा. म्हणजेच सर्वात जास्त ती कंपनी कंपनीकडे आलेले क्लेम देते. म्हणजे एखाद्या कंपनीकडे वर्षाला शंभर लोक मृत्यू पावले आणि त्यांच्या विमा रकमेची मागणी करण्यात आली. शंभर पैकी किती लोकांचे क्लेम कंपनी मार्फत मंजूर करण्यात आले? म्हणजेच 100 पैकी 97 क्लेम जर कंपनीने दिले असतील तर त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो 97% येतो. हा जास्तीत जास्त असावा.
  • Claims Rejection Ratio यामध्ये कंपनीकडे आलेले किती claim नाकारले आहेत हे समजते.
  • विमा कंपनी मार्फत आकारला जाणारा विमा हप्ता.
  • विमा कंपनी कोणत्या वयापर्यंत विमा संरक्षण देते याची माहिती घ्यावी.
  • विमा पॉलिसी पूर्वी मेडिकल तपासणी केली जाते का?

  विमा कंपन्यांचा तुलनात्मक विचार करून आपल्यासाठी एक टर्म प्लान आवश्य खरेदी करा.

विमा हप्त्यावर करसवलत (Tax benefit) मिळते काय?

टर्म लाइफ इन्शुरन्स (Term Life Insurance)  च्या विमा हप्त्यावर आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सूट मिळते. या कलमांतर्गत जास्तीत जास्त सर्व प्रकारच्या1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळू शकते.

Post a Comment

0 Comments