Socialize

How to check YCMOU result 2022

 YCMOU result 2022 | YCMOU चा निकाल २०२२ 

                    यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत दरवेळी वर्षातून दोन वेळा परीक्षा घेतल्या जातात. त्या हिवाळी सत्रात व उन्हाळी सत्रात घेतल्या जातात.

                     शैक्षणिक वर्ष २०२१-२२ हिवाळी सत्रातील परीक्षा डिसेंबर पासून सुरू झाल्या होत्या त्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यात संपल्या होत्या. या सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाल्या होत्या. त्या परीक्षांचा निकाल विद्यापीठामार्फत विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. आपण आपल्या अभ्यासक्रमाचा रिझल्ट ऑनलाइन पहू शकतो.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक (YCMOU Result 2022)चा रिजल्ट कसा पाहावा?

                    यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या अधिकृत संकेतस्थळावर आपण डिसेंबर 2021 व त्या पूर्वीच्या सर्व परिक्षांचा रिझल्ट ऑनलाइन पाहू शकतो. कोणत्याही वर्षाचा रिझल्ट पाहण्यासाठी आपल्याला अचूक एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करणे आवश्यक आहे.

YCMOU Result पाहण्यासाठीचे टप्पे

  • सर्वप्रथम आपल्या फोन मधील ब्राउझर ओपन करा आणि सर्च बॉक्स मध्ये पुढील वेबसाईट टाईप करा.  https://ycmou.digitaluniversity.ac/

  • त्यानंतर home page पेज ओपन होईल. त्यातील वरील भागामध्ये रिजल्ट Result tab क्लिक करा.

  •  Result tab वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर खालील प्रमाणे पेज ओपन होईल. यातील डाव्या बाजूच्या डिसेंबर 2021 - फेब्रुवारी २०२२ ही नवीन tab दिसते आहे त्यावर क्लिक करा.


  • त्यानंतर आपल्या समोर डिसेंबर ते फेब्रुवारी कालावधीमध्ये झालेल्या सर्व परीक्षा अभ्यासक्रमांची लिस्ट दिसेल. त्यातील आपल्या अभ्यासक्रमा समोरील click here या लिंक वर क्लिक करा.

  • त्यानंतर सर्वात प्रथम एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करा. म्हणजेच आपण exam जर जानेवारी-फेब्रुवारी 2022 महिन्यात दिली असेल तरीही ही Exam Event डिसेंबर 2021 निवडा. यापूर्वी परीक्षा दिली असल्यास आपण त्यापूर्वीच Exam Event ते सिलेक्ट करा.

  • त्यानंतर त्याखालील बॉक्स मध्ये आपल्याला आपला PRN नंबर टाकायचा आहे. सर्वात शेवटी Captcha code टाकून सबमिट करा.

  • त्यानंतर आपल्यासमोर आपला अभ्यासक्रम व इतर माहिती दिसून येईल. त्यातील View रिझल्ट याच्यावर क्लिक करून आपण आपला रिझल्ट पाहू शकता. डाऊनलोड करु शकता.

विद्यापीठामार्फत गुणपत्रक कसे मिळते?

                    आपण आपला रिझल्ट ऑनलाइन पाहू शकतो. तसेच गुणपत्रिका ऑनलाइन डाऊनलोड करू शकतो. मात्र आपल्याला विद्यापीठामार्फत मूळ गुणपत्रक दिले जाते. परीक्षेच्या ठराविक कालावधी नंतर आपले मूळ प्रमाणपत्र परीक्षा केंद्रावर पाठवले जाते. तिथून ते आपण घ्यावयाचे असते.

वार्षिक /सत्र परिक्षा 2022 कधी होणार?

वार्षिक / सत्र परीक्षा 2022 या यावर्षी ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. या परीक्षा साधारणपणे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होते होतील.अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

Post a Comment

0 Comments