Socialize

YCMOU Exam June 2022

 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक परीक्षा जून 2022

                    यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत अनेक अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. दरवर्षी विद्यापीठामार्फत हिवाळी व उन्हाळी अशा दोन सत्रात परीक्षा घेतल्या जातात. गेले दोन वर्ष महामारीच्या कारणामुळे विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या गेल्या होत्या. जानेवारी फेब्रुवारी 2022 मध्ये झालेल्या परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या आहेत.

ycmou exam 2022


YCMOU Exam 2022 (सत्र / वार्षिक) कधी होणार?

                विद्यापीठामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनापत्र  01/06 नुसार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व शिक्षणक्रमाच्या सत्र /वार्षिक लेखी परीक्षा 2022 या सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत. सर्व लेखी परीक्षा सर्वसाधारणपणे जून व जुलै या महिन्यात होण्याची शक्यता आहे.

YCMOU Exam 2022 (सत्र / वार्षिक) ऑनलाईन होणार की ऑफलाइन होणार?

                जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक च्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा या पूर्वी प्रमाणे ऑफलाइन पद्धतीने होणार आहे देशातील कोरोना रुग्णांची संख्या सध्या कमी झाल्याने यावर्षी सर्व परीक्षा या ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत.

YCMOU Exam 2022 प्रश्नांचे स्वरूप कसे असेल?

                        गेले दोन वर्ष कोरोनामुळे विद्यापीठाच्या सर्व परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने झाल्या आहेत. या ऑनलाईन परीक्षांमध्ये सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे होते. मात्र यावर्षी जून 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याकारणाने या वर्षीच्या परीक्षा यापूर्वी प्रमाणेच विवरणात्मक (descriptive) प्रश्नांची असणार आहे.

YCMOU Exam 2022 Time table

                यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहेत. या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे. त्यासाठी संकेतस्थळाला अवश्य अवश्य भेट द्या.
                त्याचबरोबर परीक्षेबाबतच्या विविध सूचना, रिपीटर परीक्षा अर्ज सुरू आहे होण्याची तारीख यासाठी वेळोवेळी विद्यापीठाच्या https://ycmou.digitaluniversity.ac/ पोर्टलवर Examination Tab मध्ये माहिती पहावी.

Post a Comment

0 Comments