Socialize

Ycmou exam online or offline

 YCMOU Exam feb 2022

ऑनलाईन की ऑफलाईन होणार?

You exam online or offline


यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत हिवाळी परीक्षांचे आयोजन फेब्रुवारी 2022 मध्ये करण्यात आले आहे. या परीक्षेबाबत सूचना वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली होती आणि या सूचनेनुसार या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार होत्या; मात्र विद्यापीठाद्वारे पुन्हा एकदा एक सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे या सूचनेनुसार महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने व ओमायक्रोन नवीन कोरोना विषाणूंच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असल्याने शासनाने लावलेले नवीन निर्बंध आणि युजीसीच्या निर्देशानुसार विद्यापीठामार्फत या परीक्षा ऑफलाईन ऐवजी आता ऑनलाइन घेण्यात येणार आहेत. म्हणजेच या परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. परीक्षा दिनांक 8 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होणार असून याबाबतचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हे वेळापत्रक विद्यापीठाच्या https://ycmou.digitaluniversity.ac/ या वेबसाइटवरील Examination या tab वरून आपण डाऊनलोड करून घेऊन पाहू शकता. 

परिक्षबाबत महत्वाच्या सूचना:

  1. एकूण  56 शिक्षणक्रमच्या परीक्षा 8 फेब्रुवारी 2022 पासून सुरू होणार आहेत.
  2.  ही परीक्षा 80 गुणांची असणार आहे यासाठी परीक्षेमध्ये 50 प्रश्न विचारले जाणार असून त्यापैकी 40 प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे 40 प्रश्नांचे 80 गुण होतील.
  3.  80 पैकी मिळालेले गुण आपल्या गुणपत्रिकेमध्ये पाहायला मिळतील.
  4. ऑनलाइन परीक्षा घेत असताना विद्यार्थ्यांच्या हालचालीवर सॉफ्टवेअर द्वारे आणि वेबकॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यास सॉफ्टवेअरद्वारे विद्यार्थ्यांना सूचना देण्यात येतील; या सूचना विशिष्ठ मर्यादेपेक्षा जास्त वेळा दिल्यास आपली परिक्षा बंद होईल आणि आपल्याला चौकशी समितीसमोर हजर राहावे लागेल.
  5.  प्रश्नपत्रिका सोडवताना सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय उपलब्ध असतील चार पर्यायातील योग्य पर्याय समोरील रेडिओ बटनाला क्लिक करणे आवश्यक आहे. पर्यायावर सिलेक्ट केल्याने आपला पर्याय सिलेक्ट होत नाही, तर रेडिओ बटण सिलेक्ट करावे. 
  6. आपला योग्य पर्याय निवड झाल्याची खात्री करा.
  7.  परीक्षेपूर्वी आपल्याला वेबसाईटवर परीक्षा सोडवण्या संदर्भात पीपीटी आणि डेमो परीक्षा उपलब्ध करून दिल्या जातील. त्यांचा अभ्यास करून परीक्षा सोडून आपण सराव करू शकता.
  8. 8 फेब्रुवारी पूर्वी आपल्या अभ्यासक्रमाचे वेळापत्रक डाउनलोड करा.
  9. परिक्षेपूर्वी डेमो परीक्षा सोडवून परीक्षेचे स्वरूप समजून घ्या.

Post a Comment

0 Comments