Socialize

Ycmou repeater exam 2021-2022

  Ycmou repeater exam 2021-2022 

ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत व फॉर्म भरण्याची प्रक्रिया 

ycmou exam online form


                यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत रिपिटर विद्यार्थ्यांसाठी वर्षातून दोन वेळा परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा यावर्षी डिसेंबर 2021  जानेवारी 2022 या महिन्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. सदर परीक्षेला ज्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षांची काही विषय शिल्लक राहिले असल्यास म्हणजेच एखाद्या विषयात विद्यार्थी नापास झाला असेल अथवा काही कारणास्तव त्याला काही पेपरला बसता आले नाही आशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म सादर करून आपल्या उर्वरित विषयांच्या परीक्षेसाठी बसता येईल. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी आपले अर्ज ऑनलाईन सादर करावे लागतील.ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर आपल्याला या परीक्षेला बसता येईल. 

 Ycmou repeater exam form june 2022

अर्ज भरण्याची मुदत 

  • दिनांक 29 ऑक्टोबर 2021 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत नियमित शुल्कासह ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येतील .
  • दिनांक 21 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत 100 रुपये विलंब शुल्कासह ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येतील .
 

परीक्षा फी

·         प्रमाणपत्र / पदवी  / पदविका परीक्षाकरिता फी  130 रुपये प्रतीपेपर

·          पदव्युत्तर पदवी अशा अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा फी प्रति पेपर 150 रुपये राहील .

·         मार्कशीट शुल्क 100 रुपये प्रती सेमिस्टर / वर्ष फी भरावी लागेल.

·         प्रात्यक्षिक परीक्षा 200 रुपये प्रतीपेपर(असेल तर)

                  सर्वसाधारणपणे आपल्याला बीए साठी दोन विषय राहिले असल्यास 130 + 130 म्हणजे 260 रुपये व मार्कलिस्ट शुल्क 100 रुपये असे 360 रुपये फी भरावी लागेल. अशा प्रकारे आपण आपल्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा फी पाहता येईल.

 

ऑनलाईन फॉर्म भरण्याचे टप्पे 

  • सर्वात प्रथम browser ओपन करा.
  • सर्च बॉक्स मध्ये https://ycmou.digitaluniversity.ac/  type करून सर्च करा.
  • home page वरील online exam form submission for  repeater students या उजव्या बाजूला असणाऱ्या लिंक वर क्लिक करा.
  • त्यानंतर ओपन होणाऱ्या पेज वर आपला PRN नंबर व captcha कोड टाका आणि proceed वर क्लिक करा.
  • अधिक माहितीसाठी खालील विडीओ पहा.

Thanks all of you.

Post a Comment

0 Comments