Socialize

Ycmou exam 2021 demo test/ mock test

 Ycmou exam 2021 demo test/ mock test

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ सराव परीक्षा 2021

ycmou mock test




                        यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक मार्फत निरनिराळ्या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. यावर्षी कोरोनामुळे मागील शैक्षणिक वर्षातील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यावर्षी या परीक्षा मे महिन्याऐवजी ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहेत. कोरोनामुळे या वर्षीही या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. ऑनलाइन परीक्षा देताना परीक्षेचे स्वरूप लक्षात यावे यासाठी विद्यापीठामार्फत Demo Test/ Mock Test म्हणजेच सराव परीक्षा उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आपण या 
Demo Test/ Mock Test  सराव परीक्षा देऊ शकता. Demo Test/ Mock Test सराव परीक्षा देण्यामुळे आपल्याला परीक्षेचे स्वरूप लक्षात येईल, तसेच त्यासाठी लागणारा कालावधी व तांत्रिक बाबींची माहिती होईल. 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची सर्व परीक्षा देण्यासाठी खालील सूचनांचे पालन करा. 

  • सर्वात प्रथम विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट आपल्या फोन मधील ब्राउजर मध्ये टाईप करा. https://ycmou.digitaluniversity.ac/ त्यानंतर सर्च करा.
  •  सर्च केल्यानंतर आपल्यासमोर विद्यापीठाचे होम पेज ओपन होईल. होम पेज वरील Examination या वरील भागातील tabवर क्लिक करा.
  •  त्यानंतर आपल्यासमोर Examination पेज ओपन होईल. त्यातील ऑगस्ट 2021 परीक्षा Summer Examination या लिंक वर क्लिक करा.



  • त्यानंतर पुढील पेजवरील Demo Test/ Mock Test समोरील Click here या ऑप्शन वरती क्लिक करा.



  •  त्यानंतर आपल्यासमोर वरील प्रमाणे पेज ओपन होईल. या पेज मध्ये प्रथम बॉक्समध्ये आपल्याला आपला PRN नंबर टाकायचा आहे. 
  • त्यानंतर त्याच्या खालील बॉक्समध्ये आपल्याला आपली जन्मतारीख पुढील फॉरमॅटमध्ये टाकायचे आहे. DDMMYY 150292
  • त्यानंतर खालील ऑप्शन मधील Active Test सिलेक्ट करा आणि त्यानंतर Login करा. 
  • Login केल्यानंतर आपल्याला आपले प्रश्न सोडवता येतील. 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या Demo Test/ Mock Test सोडवण्यासाठी इथे क्लिक करा.



Post a Comment

0 Comments