Socialize

MAHATET EXAM 2021 timetable

  महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021

MAHATET EXAM 2021



                            महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच MAHATET Exam महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेतली जाते. या वर्षी परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.   ( https://mahatet.in/ ) सदर वेळापत्रकानुसार खालील नियोजनाप्रमाणे परीक्षेचा संपूर्ण कार्यक्रम असेल.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा २०२१ चे वेळापत्रक

अ.क्र.

कार्यवाहीचा टप्पा

दिनांक व कालावधी

ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी

०३/०८/२०२१ ते २५/०८/२०२१ वेळ २३:५९ वाजेपर्यंत

प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे.

२५/०९/२०२१ ते १०/१०/२०२१

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - I दिनांक व वेळ

१०/१०/२०२१ वेळ स. १०:३० ते दु १३:००

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - II दिनांक व वेळ

१०/१०/२०२१ वेळ दु. १४:०० ते सायं. १६:३०


परीक्षेबाबत महत्वाच्या सूचना

  • परीक्षा विषयक सर्व माहिती जसे आवेदन पत्र भरणे, परीक्षा शुल्क, परीक्षेसाठी आवश्यक पात्रता, अभ्यासक्रम  इत्यादीची माहिती आपल्याला परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in/ या संकेतस्थळावर मिळेल. त्यातील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज भरा.
  • अर्ज भरत असताना परीक्षार्थीनी दहावी, बारावी, पदवी शैक्षणिक पात्रता व व्यवसायिक पात्रता यांची माहिती तसेच आरक्षण विषयक माहिती मूळ कागदपत्रांच्या आधारे काळजीपूर्वक भरावी.
  • आवेदन पत्र भरत असताना आपला नवीनतम फोटो व स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करावयाची आहे.
  • प्रवेश अर्ज भरलेल्या उमेदवाराशी संपर्कEmail व SMS याद्वारे साधला  जात असल्यामुळे आपला स्वतःचा अचूक ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक अर्जामध्ये नोंदवावा.
  • पेपर 1 व पेपर 2 यापैकी योग्य प्रश्नपत्रिकेची निवड करावी, जर आपण दोन्ही पेपर देऊ इच्छिता तर दोन्ही पेपर देणार असल्याबाबतची नोंद अवेदन पत्रात करावी. 
  • परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र सादर करता येईल. तसेच परीक्षा शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल.
  • परीक्षा शुल्क भरणा केल्यानंतर आपले अर्ज मध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही.
  • अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येईल.
  •  आपले शुल्क भरल्याशिवाय आपला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  •  अवेदन पत्रा सोबत कोणतीही कागदपत्रे जोडण्याची आवश्यकता नाही. तसेच आवेदन पत्र व इतर कागदपत्र गटशिक्षणाधिकारी / शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही.
  • मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीस अधीन राहून परीक्षार्थींना तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. पात्रता प्रमाणपत्र वितरणाच्या वेळेस आपल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे, पडताळणीच्या वेळी कागदपत्र अपूर्ण असल्यास अथवा सादर करू न शकल्यास परीक्षा पात्रता रद्द करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments