Ycmou Online Admission Prospectus 2022-23
प्रवेश माहिती पुस्तिका 2022-23
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक मार्फत सन 2022-23 करिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 5 जुलै 2022 पासून सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठामार्फत निरनिराळ्या अभ्यासक्रमाना प्रवेश दिला जात आहे. प्रवेश घेण्याची प्रक्रिया पूर्णता ऑनलाइन आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आपण पात्र असलेल्या अभ्यासक्रमाला ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू शकतो.
कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापूर्वी त्या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती मिळणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती मिळवण्याकरिता संकेतस्थळावर उपलब्ध असलेले माहिती पुस्तक (Prospectus) डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे.माहितीपुस्तकेमधून (Prospectus) अभ्यासक्रमाचा कालावधी, अभ्यासक्रमाची फी, मूल्यमापन पद्धती, प्रवेशासाठी आवश्यक पात्रता, online अर्ज करण्याची पद्धत इत्यादीविषयी माहिती मिळेल.
माहितीपुस्तिका Prospectus Download कशी करावी?
- आपल्या फोनमधील browser open करा.
- सर्च बॉक्स मध्ये विद्यापीठाची अधिकृत website type करा. https://ycmou.digitaluniversity.ac/
- विद्यापीठाच्या homepage वरील Admission या tab वर click करा. त्यानंतर खालील प्रमाणे page उघडेल.
- त्यातील माहितीपुस्तिका २०२२-२३ या लिंक वर click करा. त्यानंतर सर्व अभ्यासक्रमाची लिस्ट खालीलप्रमाणे दिसेल.
- त्या लिस्ट मधील आपल्याला हव्या त्या अभ्यासक्रमाच्या पुढील click here या tab वर click करा. त्या अभ्यासक्रमाची माहितीपुस्तिका आपल्या फोनमध्ये डाउनलोड होईल.
माहिती पुस्तिका डाउनलोड पेज वर जाण्यासाठी इथे क्लिक करा.
Online Admission घेण्यापूर्वी माहिती पुस्तिका download करा.
0 Comments