कृषी शिक्षणक्रम अंतिम परीक्षा 2021
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान विद्याशाखेअंतर्गत कृषी शिक्षणक्रमाच्या प्रमाणपत्र, पदविका, पदवी शिक्षणक्रमाकरिता प्रवेश दिला जातो. सन 2020-21 वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या अंतिम प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक 1ते 10 मे 2021 या कालावधीत व अंतिम लेखी परीक्षा 15 ते 25 मे 2021 या कालावधीत आयोजित करण्यात येणार होती. त्याबाबतची माहिती या अभ्यासक्रमाच्या माहिती पुस्तके दिली होती.
तथापि सध्या संपूर्ण महाराष्ट्रात covid-19 मुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.कोविड 19 चा संसर्ग झपाट्याने वाढत असून मोठ्या प्रमाणावर कोविड रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे मे, २०२१ ला होणारी पूर्व नियोजित परीक्षा युजीसी ने दिलेल्या मार्गदर्शक सूचना व महाराष्ट्र शासनाचे वेळोवेळी येणारे निर्णय विचारात घेऊन कृषी शिक्षणक्रमाच्या अंतिम परीक्षा जुलै-ऑगस्ट, २०२१ मध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक व इतर तपशील नंतर कळवण्यात येणार आहे. कोरोनाची परिस्थिती पाहून परीक्षा online की ऑफलाईन होईल याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
कृषी शिक्षणक्रम अभ्यासक्रमांचे प्रकल्प विद्यार्थ्यांनी अभ्यासकेंद्रावर दिनांक 1ते 10 मे 2021 या कालावधीत सादर करावयाचे आहेत. पदवी प्रकल्पावरील तोंडी परीक्षा दिनांक 1ते 15 जुलै 2021 या कालावधीत अभ्यासकेंद्रावर होतील. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक १५ दिवस अगोदर कळवण्यात येईल. वेळोवेळी होणाऱ्या बदलांची माहिती मिळवण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला https://ycmou.digitaluniversity.ac/ भेट द्या.
0 Comments