Ycmou repeater and regular exam 2021
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पुनर्परीक्षा व नियमित परीक्षा
जगभरामध्ये निर्माण झालेल्या कोविड 19 परिस्थितीमुळे देशभरामध्ये सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या किंवा त्या ऑनलाईन घेण्यात येत आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या परीक्षा (repeater and regular) यावर्षी होणार की नाही, होणार असतील तर कोणत्या अभ्यासक्रमच्या, ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार याबाबत अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहेत.
कोणत्या अभ्यासक्रमाच्या पुनर्परीक्षा (Repeater exam) होणार ?
विद्यापीठामार्फत यावर्षी कोणकोणत्या अभ्यासक्रमाच्या पुनर्परीक्षा (Repeater exam) होणार आहेत व कोणकोणत्या अभ्यासक्रमाच्या पुनर्परीक्षा (Repeater exam) होणार नाहीत याबाबतचे सूचनापत्र विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. विद्यापीठामार्फत जवळजवळ 112 अभ्यासक्रमाची लिस्ट संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 112 अभ्यासक्रमा पैकी 111 अभ्यासक्रमाच्या पुनर्परीक्षा होणार आहेत फक्त एका अभ्यासक्रमाची पुनर्परीक्षा (Repeater exam) रद्द करण्यात आली आहे. C-55 Rugnasahayak (Patient Assistant) या अभ्यासक्रमाची पुनर्परीक्षा होणार नाही उर्वरित सर्व अभ्यासक्रमांची पुनर्परीक्षा होणार आहेत. म्हणजे विद्यापीठाच्या जवळजवळ सर्वच पुनर्परीक्षा (Repeater exam) होणार आहेत.
फ्रेशर अथवा नियमित ( Fresher / Regular) परीक्षा
विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या 112 अभ्यासक्रमा पैकी जवळपास 48 अभ्यासक्रमाच्या नियमित परीक्षा होणार आहे आहेत व उर्वरित सर्व 64 अभ्यासक्रमाच्या नियमित परीक्षा रद्द करण्यात आले आहेत. कोणत्या अभ्यासक्रम नियमित परीक्षा होणार व कोणत्या अभ्यासक्रमाच्या होणार नाहीत ही लिस्ट डाउनलोड करण्याासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. लिस्ट डाऊनलोड केल्यानंतर त्यातील आपला अभ्यासक्रम शोधा आपली परीक्षा होणार की नाही याची खात्री करा.
फ्रेशर अथवा नियमित ( Fresher / Regular) परीक्षा या जुलै-ऑगस्ट महिन्यात होणार आहेत.
0 Comments