Socialize

shabdachi jat nam | शब्दाच्या जाती- नाम

 

शब्दाच्या जाती



       मराठी मध्ये एकूण आठ शब्दांच्या जाती आहेत. आपण बोलतो ते सर्व शब्द या शब्दाच्या कोणत्यातरी एखाद्या गटांमधील असतात. यामध्ये  नाम,सर्वनामविशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय,शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय या जातींचा समावेश होतो. या प्रत्येक जातीची थोडक्यात माहिती पाहुया.

 नाम

१. नाम-   वस्तूच्या, पदार्थाच्या, व्यक्तीच्या व द्रव्याच्या नावांना नाम असे म्हणतात.

 

 यामध्ये सर्व प्रकारच्या वस्तू, शरीराचे अवयव, खाण्याचे पदार्थ, नदी, पर्वत, गावे त्यांची नावे, व्यक्तींची नावे व आडनावे, काल्पनिक नावे या सर्वांचा समावेश होतो.

 उदाहरणार्थ- शाळा, खुर्ची, भाकरी, मामा, झाड, फळ इत्यादी

 

 नामाचे तीन प्रकार आहेत  ते   पुढील प्रमाणे-

 

                   अ) सामान्य नाम:- समान गुणधर्मामुळे वस्तूला, पदार्थाला, व्यक्तींना दिलेल्या नावाला सामान्य नाम म्हणतात.

  • उदा- शाळा, घर, पुस्तक, नदी, डॉक्टर, झाड, समुद्र, मुलगा, रंग, पिके, कडधान्ये, पर्वत इ.


              ब) विशेष नाम:-ज्या नामामुळे एका विशिष्ट पदार्थाचा, प्राण्याचा, व्यक्तीचा, वस्तूचा अथवा द्रव्याचा बोध होतो त्यास विशेष नाम म्हणतात.

उदा- हिमालय, रोहन, गंगा, मुग, भारत, कोल्हापूर, दिल्ली, हिंदी महासागर , आंबा इत्यादी.

 

            क) भाववाचक नाम:- ज्या नामामुळे आपल्याला वस्तूतील, द्रव्यातील, प्राण्यातील गुण, भाव किंवा धर्माचा बोध होतो त्यास भाववाचक नाम म्हणतात.

उदा- नम्रता, श्रीमंती, गोडवा, शौर्य, प्रामाणिकपणा, गरिबी इत्यादी.

 

 

Post a Comment

0 Comments