Socialize

sarvnam v prakar | सर्वनाम व त्याचे प्रकार

 

 

२. सर्वनाम

सर्वनाम व प्रकार

                      नामाऐवजी येणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.

 उदारणार्थ- मी, माझेमला, तू, तुझे, त्याचे, त्या, त्यांना इत्यादी.


सर्वनामाचे मुख्य सहा प्रकार आहेत ते खालील प्रमाणे

 

१. पुरुषवाचक सर्वनाम

पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार आहेत.

i) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम

उदा- मी, आम्ही, आपण मला, माझे इत्यादी.

 

ii) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम

उदा- तू, तुम्ही, तुम्हाला, तुमच्या, आपण इत्यादी.

 

iii) तृतीय पुरुषवाचक सर्वनाम

उदा- तो, ती, ते, त्यांचे त्याचे इत्यादी.

 

२. दर्शक सर्वनाम:- वस्तू, पदार्थ, व्यक्ती  दाखविण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते. त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात.

उदा – हे, तो, ती, ते , हा, ही इत्यादी.

३. प्रश्नार्थक सर्वनाम:- प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात.

उदा- कोण, कोणी, कोणाला इत्यादी.

 

४. आत्मवाचक सर्वनाम:- स्वतःसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात.

उदा- मी, स्वतः, आपण, मला, माझा इ.

 

५. अनिश्चित सर्वनाम:-  जी सर्वनामे कोणत्या नामाबद्दल आली आहे ते निश्चित सांगता येत नाही त्यांना अनिश्चित सर्वनाम म्हणतात.

उदा- कोण, कोणी, काय इ.

 

६. संबंधी सर्वनाम:- वाक्यातील संबंध दाखविणार्‍या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात.

उदा – जो, जे, ज्याला , ज्याच्या, ज्या

जो अभ्यास करेल तो पास होईल.

ज्याला वही सापडेल त्याला ती मिळेल.

 

 

 

Post a Comment

0 Comments