प्रयोग व प्रयोगाचे प्रकार
प्रयोग:-
वाक्यातील कर्ता ,कर्म व क्रियापद
यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात.
मराठी भाषेत
प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार आहेत.
१.कर्तरी प्रयोग
२.कर्मणी प्रयोग
३.भावे प्रयोग
१) कर्तरी प्रयोग
जेंव्हा क्रियापदाचे
रूप हे वाक्यातील कर्त्याच्या लिंग अथवा वचनानुसार
बदलते, त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा-
तो जोरात पाळतो.
ती जोरात पाळते.
ते जोरात पाळतात.
वरील
वाक्यात कर्ता (तो,ती,ते ) बदलल्यावर क्रीयापादामध्ये (पाळतो, पाळते, पाळतात) बदल
झालेला दिसतो.
कर्तरी प्रयोगाचे दोन
उपप्रकार पडतात.
१. सकर्मक कर्तरी प्रयोग :- कर्तरी प्रयोगाच्या
वाक्यात कर्म असेल तर त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात.
उदा- दीपक कब्बडी खेळतो.
दीपा
कब्बडी खेळते.
मुले
कब्बडी खेळतात.
वरील वाक्यात कब्बडी कर्म आहे. दीपक, दीपा, मुले कर्ता
आहेत. कर्त्याचे लिंग व वाचन बदलल्याने क्रीयापादामध्ये बदल झालेला दिसतो, म्हणून
या वाक्यांत सकर्मक कर्तरी प्रयोग आहे.
2. अकर्मक कर्तरी प्रयोग:- कर्तरी प्रयोगाच्या
वाक्यात कर्म नसेल तर त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात.
उदा- सम्यक
उठला.
निशा
उठली.
निशा
व सम्यक उठले.
वरील वाक्यात कर्म नाही आहे. सम्यक व निशा कर्ता
आहेत. कर्त्याचे लिंग व वाचन बदलल्याने क्रीयापादामध्ये बदल झालेला दिसतो, म्हणून
या वाक्यांत अकर्मक कर्तरी प्रयोग आहे.
२.कर्मणी प्रयोग
जेंव्हा वाक्यातील
क्रियापद हे कर्माच्या लिंग, वचनानुसार बदलते तेंव्हा त्याला कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा- दादाने आंबा खाल्ला.
दादाने आंबे खाल्ले.
दादाने काकडी खाल्ली.
वरील वाक्यात कर्माच्या (आंबा, आंबे,
काकडी) लिंग व वचनानुसार क्रीयापादामध्ये (खाल्ला, खाल्ले, खाल्ली) बदल होतो.म्हणून
यात कर्मणी प्रयोग आहे.
कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार आहेत.
१. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग
२.नवीन कर्मणी प्रयोग
3. समापन कर्मणी प्रयोग
४. प्राचीन कर्मणी प्रयोग
५. शक्य कर्मणी प्रयोग
३.भावे प्रयोग:
जेंव्हा क्रियापदाचे रूप हे वाक्यातील कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग अथवा वचनानुसार बदलत नाही , त्याला भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा- शेतकऱ्याने बैलाला जुंपले.
शेतकऱ्यांनी बैलाला जुंपले.
शेतकऱ्याने
बैलांना जुंपले.
वरील वाक्यात कर्ता व कर्म बदलल्यावर
क्रीयापादामध्ये काहीही बदल होत नाही म्हणून या वाक्यात भावे प्रयोग आहे.
भावे
प्रयोगाचे ३ उपप्रकार आहेत.
१. सकर्मक भावे प्रयोग :- भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म असेल तर त्याला
सकर्मक भावे प्रयोग म्हणतात.
उदा- वाघाने हरीणीस मारले.
२. अकर्मक भावे प्रयोग :- भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म नसेल तर त्याला
अकर्मक भावे प्रयोग म्हणतात.
उदा- मुलांनी यावे.
३. अकर्तुक भावे प्रयोग- भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता नसेल तर त्यास अकर्तुक भावे प्रयोग म्हणतात.
उदा- खाली बसावे.
0 Comments