Socialize

क्रियाविशेषण अव्यय व त्यांचे प्रकार

 

क्रियाविशेषण अव्यय

शब्दाच्या जाती


                  क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

क्रिया केव्हा, कोठे, कशी  घडली याबाबत माहिती देणारे शब्द क्रियाविशेषण अव्यय असतात. 

उदाहरणार्थ- मुलगा मैदानात जोरात धावला. यामध्ये जोरात हा शब्द धावला या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो, म्हणून जोरात हे क्रियाविशेषण अव्यय आहे.

 

क्रियाविशेषण अव्ययांचे मुख्य 2 प्रकार आहेत.

1.      अर्थावरून
2.      स्वरूपावरून

 अर्थावरून पडणारे प्रकार :

1. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय :ज्या शब्दामुळे एखादी क्रिया केव्हा घडली त्याचा काळ दाखवणारा शब्द म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.

उदा. आज, काल, उद्या, या वर्षी, लगेच, नंतर, जेव्हा,रात्री, आधी, आता, परवा, नेहमी, दिवसभर, दररोज, केव्हा इत्यादी.

Ø मी आज बाजारात जाणार आहे.

Ø तो रात्री अभ्यास करत होता.

Ø राजू दररोज शाळेत जातो.

Ø अजय वारंवार गैरहजर राहते.


2. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय :

ज्या क्रियाविशेषनामुळे क्रियेच्या जागेचा, ठिकाणाचा बोध होतो त्याला स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय म्हणतात.

उदा.  वर, खाली अलीकडे, मागे, पुढे, जिकडे-तिकडे, कोठे, मध्ये, मागे, पुढे इत्यादि.

Ø  तो  खाली बसला होता.

Ø  राम आणि श्याम बाजारात भेटले.

Ø  चालताना अचानक मागून कुत्रा आला.

Ø  तो अलीकडेच राहायला आलाय.


3. रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय वाक्यातील क्रिया घडण्याची रीत दाखवणाऱ्या शब्दाला  रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा.  जसे, उगीच, कसे, सावकाश, लवकर, हळू, नक्की खरोखर, चटकन,नक्की इत्यादी.

Ø  रमेश हळूहळू जेवतो.

Ø  तो कसा बसतो?

Ø  आई पटापट काम आवरते.

Ø  .मी नक्की येईन.


4. संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय वाक्यातील ज्या क्रिया क्रियाविशेषणामुळे क्रिया किती वेळा घडली याचा बोध होतो त्या अव्ययास संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा- जास्त, क्वचित, थोडे, भरपूर, कमी, अतिशय , कमी,  काहीसा, जरा इत्यादी.

Ø  तो नेहमी अभ्यास करतो.

Ø  तू जरा इकडे लक्ष दे.

Ø  कुत्रा अतिशय इमानदार आहे.


5. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाला प्रश्नार्थक बनवणाऱ्या क्रियाविशेषणाला प्रश्नार्थक क्रियाविशेषण म्हणतात.

उदा.  

Ø  तू शाळेत येशील का?

Ø  तू अभ्यास केलास ना?


6. निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय जे शब्द क्रियेचा नकार अथवा निषेध दर्शवतात त्यांना निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.

उदा.

Ø तो विसरता भेटेल.

Ø मी घाबरता आलो.

 

स्वरूपावरून पडणारे प्रकार :

. साधीत क्रियाविशेषण अव्यय नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या पासून तयार झालेल्या क्रियाविशेषण अव्ययला साधीत क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.

यांची 2 गटात विभागणी होते.

साधीत क्रियाविशेषण अव्यय

Ø  नामसाधीत: घरी, दिवसा, दुपारी, व्यक्तिश इ.

Ø  सर्वनामसाधीत: यावरून, त्यांच्यामुळे, त्यामुळे इ.

Ø  विशेषणसाधीत: छोट्याने, पाचदा, मोठ्याने इ.

Ø  धातुसाधीत:मारताना, खेळताना, हसतांना, धावताना इ. अव्ययसाधीत: कोठून, इकडून, खालून, वरून.

Ø  प्रत्यय सधीत: वेळेनुसार, लक्षपूर्वक इ.

उदा. 

Ø  तो घरी आला.

Ø  ती मला व्यक्तिश: भेटली.

Ø   तो अभ्यास मन:पूर्वक करतो.


२.सामासिक क्रियाविशेषण अव्यय :- दोन शब्द एकत्र येऊन तयार होणारा सामासिक शब्द क्रीयाविशेशानाचे काम करतो त्याला सामासिक क्रियाविशेषण अव्यय म्हणून ओळखले जाते.

उदा. घरोघरी, जाताजाता, पाठोपाठ, गैरफायदा, दुरुपयोग इ.

Ø  तो आज गैरहजर होता.

Ø  चोराच्या पाठोपाठ पोलीस आले..

 

Post a Comment

0 Comments