Socialize

Shabdachya jati | शब्दाच्या जाती

 

शब्दाच्या जाती

शब्दाच्या जाती

         मराठी मध्ये एकूण आठ शब्दांच्या जाती आहेत. आपण बोलतो ते सर्व शब्द या शब्दाच्या कोणत्यातरी एखाद्या गटांमधील असतात.                                                        यामध्ये  नामसर्वनाम,  विशेषणक्रियापदक्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्ययउभयान्वयी अव्ययकेवलप्रयोगी अव्यय या जातींचा समावेश होतो. या प्रत्येक जातीची थोडक्यात माहिती पाहुया.

१. नाम-  

 वस्तूच्यापदार्थाच्याव्यक्तीच्या व द्रव्याच्या नावांना नाम असे म्हणतात.

 यामध्ये सर्व प्रकारच्या वस्तूशरीराचे अवयवखाण्याचे पदार्थनदीपर्वतगावे त्यांची नावेव्यक्तींची नावे व आडनावेकाल्पनिक नावे या सर्वांचा समावेश होतो.

 उदाहरणार्थ- शाळाखुर्चीभाकरीमामाझाडफळ इत्यादी

          नामाचे तीन प्रकार आहेत  ते   पुढील प्रमाणे-

                अ) सामान्य नाम 

उदा- शाळाघर,पुस्तकनदीडॉक्टरझाडसमुद्रमुलगा,पर्वत इ.

                ब) विशेष नाम

                उदा- हिमालय, रोहन, गंगा, मुगभारतहिंदी महासागर , आंबा इत्यादी.

                क) भाववाचक नाम

            उदा- नम्रता, श्रीमंती, गोडवा, शौर्य, प्रामाणिकपणा, गरिबी इत्यादी.

 

                २.  सर्वनाम-     

                          नामाऐवजी येणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.

                 उदारणार्थ- मीमाझ,  मलातूतुझेत्याचेत्यात्यांना इत्यादी.

                    सर्वनामाचे मुख्य सहा प्रकार आहेत ते खालील प्रमाणे

          १. पुरुषवाचक सर्वनाम

पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार आहेत.

i) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम

उदा- मी, आम्ही, आपण मला, माझे इत्यादी.

ii) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम

उदा- तू, तुम्ही, तुम्हाला, तुमच्या, आपण इत्यादी.

iii) तृतीय पुरुषवाचक सर्वनाम

उदा- तो, ती, ते, त्यांचे त्याचे इत्यादी.

२. दर्शक सर्वनाम

उदा – हेतोतीते , हा, ही इत्यादी.

३. प्रश्नार्थक सर्वनाम

उदा- कोण, कोणी, कोणाला इत्यादी.

४. आत्मवाचक सर्वनाम

उदा- मी, स्वतः, आपण, मला, माझा इ.

५. अनिश्चित सर्वनाम

उदा- कोण, कोणी, काय इ.

६. संबंधी सर्वनाम

उदा – जो, जेज्याला , ज्याच्या, ज्या

जो अभ्यास करेल तो पास होईल.

ज्याला वही सापडेल त्याला ती मिळेल.

                ३. विशेषण- नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात.

 उदाहरणार्थ- मुलगा हुशार आहे. या वाक्यात मुलाबद्दल म्हणजेच नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द  हुशार हा आहेम्हणून हुशार हे विशेषण आहे.त्याचप्रमाणे चवदारप्रचंडसुंदरकाळारंगीबेरंगी,  वाकडाथंडगार, पाच इत्यादी विशेषण आहेत.

            विशेषणाचे मुख्य तीन प्रकार आहेत.

१. गुणवाचक विशेषण:- ज्या शब्दामुळे नामाचे गुण, अवगुण, रंग, रूप, आकार यांचा बोध होतो त्या शब्दांना गुणवाचक विशेषण म्हणतात.

उदा- सुंदर, हुशार, कुरूप, शुभ्र, चपळ, भित्रा, शूर, पराक्रमी, हिरवेगार, उंच इत्यादी.

राजू हुशार आहे.

ससा भित्रा आहे.

सिंह क्रूर आहे.

२. संख्यावाचक विशेषण:- ज्या शब्दामुळे नामाविषयी संख्यात्मक माहिती सांगितली जाते त्याला संख्यावाचक विशेषण म्हणतात.

उदा- दोन, पाच, दुप्पट, पाचपट, बारा इत्यादी.

पियुषजवळ दोन पेरू आहेत.

मेघाने पाच लिटर तेल आणले.

३. सार्वनामिक विशेषण:- सर्वानामापासून बनलेल्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण म्हणतात.

उदा- तो मुलगा

हे झाड

 

 

 

                ४. क्रियापद- वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात.

 उदाहरणार्थ-  पियुष बाजारात गेला. या वाक्यातील गेला या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो म्हणून त्याला क्रियापद म्हणतात. केलाजाईलखाईलनिघालाझोपला, मारणे, खेळणे, पळाला इत्यादी क्रियापद सांगता येतील.

 

                                        

 क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार आहेत 

·         १.सकर्मक क्रियापद: वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यसाठी जेव्हा कर्माची गरज असते तेव्हा अशा वाक्यातील क्रियापदाला सकर्मक क्रियापद म्हणतात.

·         उदा- राजू अभ्यास करतो.

·         बगळा मासा पकडतो.

 

·         २. अकर्मक क्रियापद:- वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यसाठी जेव्हा कर्माची गरज नसते तेव्हा अशा वाक्यातील क्रियापदाला अकर्मक क्रियापद म्हणतात.

·         उदा- तो झोपला.

मी दररोज कामावर जातो.

 

 

                ५.क्रियाविशेषण अव्यय- क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

क्रिया केव्हा, कोठे, कशी  घडली याबाबत माहिती देणारे शब्द क्रियाविशेषण अव्यय असतात.

 

उदाहरणार्थ- मुलगा मैदानात जोरात धावला. यामध्ये जोरात हा शब्द धावला या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो, म्हणून जोरात हे क्रियाविशेषण अव्यय आहे.

 

                ६.शब्दयोगी अव्यय- जे शब्द नाम, सर्वनाम यांना जोडून येतात व त्यांचा वक्यातील इतर शब्दाशी संबंध दर्शवितात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

 

उदा- वहीवर पेन्सिल ठेव. या वाक्यात वही नाम आहे. या नामाला जोडून आलेला  ' वर ' शब्द शब्दयोगी अव्यय आहे.

 

                ७.उभयान्वयी अव्यय- दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदा-१) राम आणि राजू दोघे मित्र आहेत.

         २) मी घरी असेल किंवा बाजारात असेन.

वरील पहिल्या वाक्यात आणि या शब्दांने दोन शब्द जोडलेत तर दुसऱ्या वाक्यात किंवा या शब्दाने दोन वाक्य जोडली आहेत. याबरोबरच व, अथवा, अगर, की, म्हणून, तेव्हा, कारण इत्यादी उभयान्वयी अव्यय आहेत.

 

                    ८. केवलप्रयोगी अव्यय- आपल्या मनातील आश्चर्य, दु:ख, तिरस्कार, राग इ. भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय म्हणतात.

उदा- बापरे!, अबब!, अरेरे!, शाब्बास!, वाव!, छान!, शी! इत्यादी

 

 

Post a Comment

0 Comments