Socialize

Vakprachar v arth वाक्प्रचार व त्यांचा अर्थ

 वाक्प्रचार व त्यांचा अर्थ



मराठीमध्ये  भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी  अनेक वाक्प्रचारांचा वापर केला जातो. यातील  काही वाक्प्रचार  व त्यांचा अर्थ याठिकाणी देत आहे.

1) कुजबुजणे- हळू आवाजात बोलणे

2) अधीर होणे-   उत्सुक  होणे

३) सामसूम होणे- शांतता पसरणे

४) डोके वर काढणे- एखादा विचार पुन्हा पुन्हा मनात येणे

५) गलका होणे-  गोंगाट होणे

६) धूम ठोकणे- पळून जाणे

७) प्रोत्साहन देणे- प्रेरणा देणे.

८) भारावून जाणे- प्रभावित होणे.

९) दंग होणे- मग्न होणे

१०) घाम गाळणे- कष्ट.

११) फस्त करणे- संपवून टाकणे.

१२) नाद लागणे- सवय लागणे. 

१३)आरंभ होणे- सुरुवात होणे.

१४) मनाला लागणे- वाईट वाटणे.

१५) घाबरगुंडी उडणे- खुप घाबरणे.

१६) पोटात कावळे ओरडणे- खूप भूक लागणे.

१७)  खजील होणे- लाज वाटणे.

१८) अस्वस्थ होणे- चैन न पडणे.

१९) निश्चय करणे- निर्धार करणे.

२०) तहान भूक विसरणे- एकाग्रतेने मग्न होणे.

२१)प्रसार होणे- पळून जाणे.

२२) पगडा असणे- प्रभाव असणे.

२३) शाबासकी देणे- कौतुक करणे.

२४) थक्क होणे-. चकित होणे

२५) स्तुती करणे- प्रशंसा करणे.

२६)  विडा उचलणे- प्रतिज्ञा करणे.

२७) वेठीस धरणे-सतत कामास लावणे.

२८) हात आवरणे- मदत थांबवणे.

२९)  अभिमान वाटणे- गर्व वाटणे.

३०) तोंडचे पाणी पळणे- खुप घाबरणे.

३१) केसाने गळा कापणे- विश्वासघात करणे.

३२) दोन हात करणे- लढाई करणे.

३३)  जिवात जिव येणे- सुटकेचा श्वास सोडणे.

३४) पाठ दाखवणे- पळून जाणे.

३५) नाक खुपसणे- मध्ये मध्ये लुडबुडणे.

३६) आभाळ कोसळणे- मोठे संकट येणे.

३७) पाय धरणे-.  क्षमा मागणे.

३८) थारा देणे- आश्रय देणे.

३९) कानाडोळा करणे- दुर्लक्ष करणे.

४०) आगीत तेल ओतणे- भांडण वाढवणे.

Thanks.


Post a Comment

0 Comments