Socialize

Shabdsamuhabaddal shabd

शब्दसमूहाबद्दल एक शब्द






 केलेले उपकार जाणणारा- कृतज्ञ

 केलेले उपकार न जाणणारा- कृतघ्न

 कविता करणारा- कवी

 कविता करणारी- कवयित्री

 अपेक्षा नसताना घडलेली  गोष्ट- अनपेक्षित

 पाऊस पडण्यापूर्वी केलेली पेरणी- धूळपेरणी

 पायात चपला वगैरे न घालता फिरणे- अनवाणी

भाषण करणारा- वक्ता 

 भाषण ऐकणारा- श्रोता

लोकांनी केलेले आंदोलन- जन आंदोलन

 अस्वलाचा खेळ करणारा- दरवेशी

 नवऱ्या मुलाची आई- वरमाई

 पायात जोडे न घातलेला- अनवाणी

पाच कोसांचा प्रदेश- पंचक्रोशी

 जग जिंकणारा- जगजेत्ता

 पहाटे पूर्वीची वेळ- उषाकाल

 नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण- संगम

 दुसऱ्याच्या मनातले जाणणारा- मनकवडा

 नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा - अभिनेता

 दररोज प्रसिद्ध होणारे- दैनिक

 आठवड्याला प्रसिद्ध होणारे- साप्ताहिक

 दर महिन्याला प्रसिद्ध होणारे- मासिक

 दर पंधरवड्याला प्रसिद्ध होणारे- पाक्षिक

 जुन्या चालीरीतींना चिकटून राहणारा- सनातनी

 माकडांचा खेळ करणारा- मदारी

 सर्व इच्छा पूर्ण करणारी  गाय- कामधेनु 

लोकांनी मान्यता दिलेला- लोकमान्य

 समाजाची सेवा करणारा- समाजसेवक

 स्वतःशी केलेले भाषण- स्वागत

 मूर्ती बनवणारा- मूर्तिकार

 पाण्याखालून जाणारी बोट- पाणबुडी

 विमान चालवणारा- वैमानिक

 हत्तीला काबूत ठेवणारा- माहूत

 लग्नासाठी जमलेले लोक-  वऱ्हाडी

 धन्यवाद!



Post a Comment

0 Comments