Socialize

Marathi Mhani

म्हणी व त्यांचा अर्थ



 अडला हरी गाढवाचे पाय धरी- शहाण्या माणसाला कठीण प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते.

 घरोघरी मातीच्या चुली-  सर्वत्र सारखी परिस्थिती असते.

 नाचता येईना अंगण वाकडे- आपल्यातील कमीपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे.

 बळी तो कान पिळी- बलवान माणूस कुमकुवत माणसावर हुकुम गाजवतो.

 पळसाला पाने तीनच- सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.

 पायावर धोंडा पाडून घेणे- स्वतःहून संकट ओढवून घेणे.

 सरड्याची धाव कुंपणापर्यंत- व्यक्तीची झेप विशिष्ट मर्यादेपर्यंतच असते.

 आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे- अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होणे.

 झाकली मूठ झाकली मुठ सव्वा लाखाची- दोष उघड न होणे चांगले.

 एक ना धड भाराभर चिंध्या- एकाच वेळी अनेक कामे करून सर्वच कामे अर्धवट सोडणे.

 पी हळद आणि हो गोरी- उतावळेपणा दाखवणे.

 आयत्या बिळावर नागोबा- दुसऱ्याच्या कष्टाचा फायदा घेणे.

  हातच्या काकणाला आरसा कशाला- प्रत्यक्ष समोर दिसणार्‍या गोष्टीला पुराव्याची गरज नसते.

 दगडापेक्षा वीट मऊ- मोठ्या संकट पेक्षा लहान संकट बरे.

 चोराच्या मनात चांदणे- आपले वाईट कृत्य दुसऱ्याला समजेल याची भीती वाटणे.

 देश तसा वेश- परिस्थितीनुसार वर्तन करणे.

 आगीतून उठून फुफाट्यात पडणे- लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे.

 कामापुरता मामा ताकापुरती आजी- स्वार्थापोटी गोड बोलणारा मतलबी माणूस. 

खाल्ल्या घरचे वासे मोजणे-  उपकार केलेल्या व्यक्तीला विसरणे.

  कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ- आपलाच माणूस आपल्या नुकसानीला कारणीभूत होणे.

 सोनाराने कान टोचणे- योग्य माणसाने समज देणे.

आपला हात जगन्नाथ- आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.


आपल्याच पोळीवर तूप ओढणे- फक्त स्वत:चाच फायदा करून घेणे.


इकडे आड तिकडे विहीर- दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे.


आंधळे दळते कुत्रं पीठ खाते- एकानं काम करावं आणि दुसर्‍यांनं त्याचा फायदा घेणे.


असतील शिते तर जमतील भुते- एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे                                                     जमा होतात.


आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास- मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.

आपलेच दात आपलेच ओठ- आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे.

आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कारटं- स्वत:चे ते चांगले आणि दुसर्‍यांचे ते वाईट अशी वृत्ती असणे.


उंदराला मांजर साक्ष- वाईट कृत्य करतांना एकमेकांना साक्ष देणे.


कानामगून आली आणि तिखट झाली- नंतर येऊन वरचढ होणे.


कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ- आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत होणे.


कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच- कितीही प्रयत्न केले तरी काहींचा मूळस्वभाव बदलता  नाही.


नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न- एखादं काम करताना त्याच्यात अनेक अडथळे येणे.




लाथ मारेन तिथे पाणी काढेन- कोणत्याही कामात यश मिळवण्याचा आत्मविश्वास असणे.





कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही- दुष्ट व्यक्तींच्या कृत्याने चांगल्या माणसाचं नुकसान होत नाही.

नावडतीचं मीठ अळणी- नावडत्या व्यक्तीने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती पसंतीस पडतच नाही.


ओठात एक आणि पोटात एक- सांगताना एक सांगणे पण करताना वेगळेच करणे.


कर नाही त्याला डर कशाला- जो चांगलं काम करतो त्याला कशाचीही भीती नसते.


करावे तसे भरावे- आपण जी चांगली-वाईट कर्म करतो त्यांची फळं आपल्यालाच भोगावी लागतात.


काखेत कळसा अन गावाला वळसा- एखादी गोष्ट स्वतःकडे असताना ती दुसरीकडे शोधत बसणे.




काम ना धाम अन उघड्या अंगाला घाम- काहीही काम न करता दिखावा करणे.

काळ आला होता पण वेळ आली नव्हती- एखाद्यावर आलेलं मोठं संकट टळणे.














Post a Comment

0 Comments