Socialize

Preparatory exam admission process

पूर्वतयारी परीक्षा नोंदणी प्रक्रिया

Preparatory exam admission process 


  पूर्व तयारी परीक्षेची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने  राबविण्यात येते. ही नोंदणी आपण घर बसल्या करू शकतो. यासाठी आपल्याकडे संगणक असणे आवश्यक आहे. याशिवाय मोबाईल वरून सुद्धा आपल्याला ऑनलाईन प्रवेश घेता येईल. पूर्वतयारी परीक्षेसाठी प्रवेश प्रक्रिया वर्षातून दोन वेळा चालू असते. जून महिन्यात प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये परीक्षा असते, व जानेवारी फेब्रुवारी मध्ये प्रवेश घेतल्यास मे महिन्यामध्ये परीक्षा देता येते. प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठाच्या या वेबसाईटवर गेल्यानंतर प्रथम आपल्याला नोंदणी करावी लागेल यासाठी आपली बेसिक माहिती म्हणजेच नाव, जन्म तारीख, फोन नंबर व ई-मेल आयडी चे आवश्यकता लागेल. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपण एखाद्या मित्राची मदत घेऊ शकता.
ही नोंदणी करत असताना खालील सूचनांचे पालन काटेकोरपणे करणे आवश्यक आहे.

  •   पूर्वतयारी परीक्षा माहिती पुस्तिकेचा बारकाईने अभ्यास करावा. शिक्षणक्रमाच्या प्रवेशास पात्र आहात याची खात्री करा आपणास खालील पैकी एका दस्तऐवजाची स्कॅन कॉपी आवश्यक आहे.

  1.  जन्मतारखेचा दाखला
  2.  परीक्षेचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र
  3.  जर आपण मागासवर्गीय उमेदवार असेल तर आपल्याकडे त्या संदर्भातील नियमाप्रमाणे जातीचा दाखला, नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट इत्यादी असणे आवश्यक आहे.
  4.  जर आपण अपंग असाल तर अपंगत्व दर्शवणारी कागदपत्रे
      आवश्यक दस्तऐवजांची स्कॅनिंग  करणे आवश्यक.
  •       आपल्याकडे चालू स्थितीत असलेला भ्रमणध्वनी क्रमांक आणि  वैध ईमेल आयडी असणे गरजेचे आहे.
  •       आपणास विद्यापीठाचे शुल्क भरण्यासाठी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग किंवा मोबाइल मनी याचा वापर करता येईल.
  • नोंदणी प्रक्रियासाठी आपण विद्यापीठाचे संकेतस्थळ याला भेट द्यावी.
  • ऑनलाइन पद्धतीने प्रवेश कसे मिळवावे या संदर्भातील स्क्रीनशॉट असलेले एक माहिती पुस्तिका संकेतस्थळावर वेगळ्या पद्धतीने उपलब्ध करून दिलेली आहे. याचा वापर केल्यास आपणास ऑनलाईन अर्ज भरणे सोयीचे जाईल.
  • आपणास संकेतस्थळावरील सूचनेप्रमाणे नाव, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती भरून युजर आयडी आणि पासवर्ड मिळावा लागेल.
  • आपण सर्व माहिती ऑनलाइन पद्धतीने सादर केल्यानंतर संगणकीय प्रणाली आपणास कागदपत्रे सादर करण्याची सूचना करेल आपण सदर कागदपत्रे अपलोड करावयाचे आहेत.
  •  सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आपण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पेमेंटचा भरणा करावा.
  •  रोखीने शुल्क अदा करायचे असल्यास आपणास ई-चलन पेंमेट करून घ्यावे लागेल. आपण सादर केलेल्या तपशिलाप्रमाणे सदरचे इलेक्ट्रॉनिक चलन संगणकीय प्रणाली तयार करते. सदरच्या चलनाच्या प्रिंटच्या दिनांकापासून दोन कार्य दिवस झाल्यानंतर भारतीय स्टेट बँक किंवा विद्यापीठाने ठरवून दिलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांच्या आपण निवडलेल्या शाखांमध्ये रोख स्वरूपात भरणा करू शकता. भरणा झाल्यानंतर बँक तपशील, मुद्रा, ट्रांजेक्शन, स्वच्छ अक्षरात लिहिलेले आहे याची खात्री करावी.
  •  आपणास ट्रांजेक्शन नंबर आपल्या विद्यापीठाच्या युजर लॉगिन करून सादर करावा लागेल.
  • ऑफलाईन पेमेंटपेक्षा Online पेमेंट करणे सोयीचे आहे.
  • नोंदणी केल्यानंतर  प्रवेश अर्जाची प्रिंट व पेमेंट ची प्रिंट काढून घ्या, ती आपल्या संग्रही ठेवा.
  •  आपण सादर केलेल्या कागदपत्रांची विद्यापीठ स्तरावरील तपासणी झाल्यानंतर आपला प्रवेश निश्चित केला जाईल याची नोंद घ्यावी.
  • प्रवेश निश्चितीबाबत आपल्याला मेसेज द्वारे व इ मेल द्वारे माहिती दिली जाईल. तसेच आपल्या लगीनला आपण ही माहिती तपासू शकतो.
               
  अशाप्रकारे आपला प्रवेश निश्चित केल्यानंतर आवश्यक ती पुस्तके विद्यापीठामार्फत आपल्याला पाठवली जातील. पुस्तके आपण दिलेल्या पत्त्यावर अथवा अभ्यास केंद्रावर पाठवली जातात. त्यांचा अभ्यास करून आपण ही परीक्षा द्यावयाची आहे. परीक्षेबाबत नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी या ब्लॉगच्या नोटिफिकेशन चालू करा.

Thanks.

Post a Comment

0 Comments