Socialize

Ycmou repeater exam form 2022

 Ycmou repeater exam form 2022-23

              Ycmou repeater exam form 2022-23 भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटवर सुरू झाली आहे. आपण आपला रिपीटर फॉर्म ऑनलाइन भरायचा आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याबाबत सविस्तर माहित आपण या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत.

Repeater form कोणी भरावा?

                                यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक ची पुनर्परीक्षा हे जे विद्यार्थी मागील वर्षातील अथवा मागील सत्रातील एखाद्या विषयात मध्ये नापास असतील अथवा एखाद्या विषयाची परीक्षा द्यावयाची राहिली असेल; अशा विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. 

Important Documents for Repeater Exam 2022

 Ycmou repeater exam form 2022 भरण्यासाठी आपल्याकडे खालील २ गोष्टी असणे आवश्यक आहे.
 • आपला PRN नंबर.
 • Online payment साठी Netbankig  किंवा debit card  

ycmou repeater exam form last date फॉर्म भरण्याची मुदत

Ycmou repeater exam form 2022-23  ही डिसेंबर महिन्यात होणार आहे. या [परीक्षेसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत 
 • 27 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2022( विना विलंब शुल्क)
 • दि 15 ऑक्टोबर 2022 ते 21ऑक्टोबर 2022 ( 100 रुपये विलंब शुल्क भरून)

Ycmou repeater exam fees 2022

सर्व शिक्षणक्रमाच्या Repeater परीक्षेसाठी शुल्क खालीलप्रमाणे असेल.
 • प्रमाणपत्र, पदविका, पदवी लेखी परीक्षा शुल्क 130 रुपये प्रती पेपर.
 • पदव्युत्तर पदवी, व्यावसायिक अभासक्रम लिखी परीक्षा शुल्क 150 रुपये प्रती पेपर.
 • प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क 300 रुपये प्रती पेपर.
 • marksheet fees 100  रुपये प्रती वर्ष.
 • विलंब शुल्क 100 रुपये


            

How to fill YCMOU repeater exam form 

Ycmou repeater exam form आपण आपल्या मोबाईलवर भरू शकतो. त्यासाठी खालील सूचनेप्रमाणे फॉर्म भरा.
 • सर्वात प्रथम आपल्या फोनमधील Browser ओपन करा.
 • search बॉक्समध्ये YCMOU ची साईट type करा. https://ycmou.digitaluniversity.ac/


 • त्यानंतर होम पेज वरील उजवीकडील भागातील Online exam form for Repeater Students यावर क्लिक करा.

 • त्यानंतर असे पेज ओपन होईल. त्यातील पहिल्या box मध्ये आपला PRN नंबर टाका. किंवा दुसऱ्या box मध्ये User name टाका. त्याखालील box मध्ये captcha टाका व submit करा.


 • त्यानंतर वरीलप्रमाणे पेज ओपन होईल. आपली संपूर्ण माहिती तपासा व निळ्या लिंक मधील submit वर क्लिक करा. • त्यानंतर वरील प्रमाणे पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला राहिलेले सर्व विषय, आपली एकूण फी दिसेल ती तपासून submit करा. 
 • आपल्यासमोर payment साठी option येईल. योग्य पेमेंट मेथड निवडा.
 • आपल्या details भरा व payment  करा.
 •  त्यानंतर आपल्या फॉर्मव payment ची प्रिंट घ्या.
अशाप्रकारे आपण आपला फॉर्म भरू शकतो.
Post a Comment

0 Comments