Ycmou Exam 2020 Notification about Timetable
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक परीक्षा 2020 बाबत सूचना
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक मार्फत दरवर्षी रेगुलर व रिपीटर विद्यार्थ्यांकरीता मे व जून महिन्यामध्ये परीक्षा घेतली जाते. परीक्षेबाबत वेळापत्रक एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाते. यावर्षी मे जून मध्ये होणाऱ्या परीक्षा महाराष्ट्र राज्यात covid-19 म्हणजेच कोरोना व्हायरस मुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता महाराष्ट्र शासनामार्फत सर्व महाविद्यालय व परीक्षा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत.
विद्यापीठामार्फत वेबसाईटवर नुकतीच एक सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सुचने मध्ये विद्यापीठामार्फत सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात आले आहे की, विद्यापीठाच्या मे/ जून मध्ये होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक शासनाच्या पुढील सूचना/ निर्देश प्राप्त झाल्यानंतर संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
महाराष्ट्रातील सद्यस्थिती पाहता विद्यापीठाच्या सूचनेनुसार या परीक्षा शासनाच्या पुढील निर्देशानुसार होणार आहेत. त्यामुळे या परीक्षा दरवर्षी प्रमाणे मे व जूनमध्ये होणे शक्य वाटत नाही, त्यामुळे या परीक्षा शक्यतो जूनच्या शेवटी व जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अधिकृत सूचना व वेळापत्रक वेबसाईटवर विद्यापीठामार्फत प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजेच या वर्षी या परीक्षा उशिरा होण्याची जास्त शक्यता आहे.
आपल्या माहितीसाठी विद्यापीठ मार्फत प्रसिद्ध केलेली सूचना डाऊनलोड करण्यासाठी देत आहे. खालील लिंकवर क्लिक करून आपण डाऊनलोड करू शकता.
0 Comments