Socialize

YCMOU Preparatory Exam purvtayari pariksha

YCMOU Preparatory Exam I पूर्वतयारी परीक्षा

पूर्वतयारी परीक्षेबाबतचे प्रश्न व उत्तरे नमस्कार मित्रांनो,
  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक मार्फत पूर्वतयारी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा ज्यांना काही कारणास्तव आपल्या बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करता आले नाही, मात्र आता पुढे शिकण्याची इच्छा आहे, यांसाठी घेतली जाते. या परीक्षेबाबत अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. अनेक प्रश्न माझ्या Let's Learn Youtube चॅनेलवर व या ब्लॉगवर विचारण्यात आले आहेत. त्या  प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न मी या पोस्टमध्ये करत आहे.


 प्रश्न 1)  पूर्वतयारी परीक्षा कोणी देणे आवश्यक आहे?


  उत्तर- मित्रांनो पूर्वतयारी परीक्षा  ही अशा विद्यार्थ्यांकरिता आहे, की ज्यांना आपलं बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करता आलं नाही, व आता त्यांना पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण आहे, अशा विद्यार्थ्यांना ती परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. त्यांना पदवीसाठी सर्व प्रवेश मिळेल.

 

प्रश्न 2)   पूर्व तयारी परीक्षा देण्यासाठी  कमीत कमी किती शिक्षण असणे आवश्यक आहे?

  उत्तर-   परीक्षा देण्यासाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही. ज्या विद्यार्थ्याला मराठी व इंग्रजी या दोन भाषा विषयाचे ज्ञान आहे, म्हणजे तो या दोन भाषा वाचू शकतो व लिहू शकतो अशी कोणतीही व्यक्ती ही परीक्षा देऊ शकते.

प्रश्न 3)   पूर्वतयारी परीक्षा पास झाल्यानंतर  आपणास कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल?

  उत्तर-  पूर्वतयारी शिक्षणक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर आपणास  फक्त मुक्त विद्यापीठाच्या पदवीपूर्व पातळीच्या अनेक प्रमाणपत्र आणि पदवी  शिक्षणक्रमांना प्रवेश घेता येईल.

 प्रश्न 4)  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामार्फत  पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन पदवी घेतल्यास शासकीय नोकऱ्यांमध्ये ती ग्राह्य धरली जाते का?

 उत्तर- हो, महाराष्ट्र शिक्षण मंडळाची माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण नसाल मात्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन पदवी परीक्षेचे प्रथम वर्ष उत्तीर्ण असलेला व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला उमेदवार पात्र समजण्यात येतो. त्यामुळे शासकीय नोकरीमध्ये आपण या पदवीचा उपयोग करून घेऊ शकतो. या बाबतचा जीआर महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे त्याचा सांकेतांक 20 1105 2013 51 04001 आहे. माहितीसाठी आपण तो डाऊनलोड करून घेऊ शकता. तो कसा डाउनलोड करायचा याबाबतच्या व्हिडिओची लिंक उत्तरा खाली देत आहे.

शासन निर्णय कसे डाउनलोड करावेत? Click here


 प्रश्न  5) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची पदवी व इतर विद्यापीठ यांची पदवी समकक्ष आहे का?

उत्तर- होय वरील शासन निर्णयानुसार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची पदवी इतर सर्व विद्यापीठांना समक्ष  मानली जाते.

  प्रश्न 6)   या विद्यापीठातून  पदवी घेतल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा म्हणजेच MPSC  परीक्षा देऊ शकतो काय?

 उत्तर- हो देऊ शकतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोग उपसचिव व परीक्षा नियंत्रक, मुंबई यांच्या पत्र क्रमांक 1477( 17/1994/ कक्ष) दिनांक 17 फेब्रुवारी 1994 या पत्रातील मान्यते संबंधीचा मजकूर-” यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे संविधीमान्य  असल्यामुळे आपल्या विद्यापीठाच्या पदवीधर विद्यार्थ्याकडून आलेले अर्ज देखील इतर मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवीधर उमेदवाराकडून आलेल्या अर्धा प्रमाणेच आयोगाकडून विचारात घेतले जातील.” याबाबत पत्र पूर्वतयारी परीक्षा माहितीपुस्तके मध्ये उपलब्ध आहे ते तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता.

प्रश्न  7) पूर्वतयारी परीक्षे साठी आवश्यक कागदपत्रे?

उत्तर- या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. वयाच्या पात्रतेसाठी आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला  झेरॉक्स, शाळेचा /कॉलेजचा बोनाफाईड दाखला- मुळप्रत, एसएससी परीक्षेचे प्रमाणपत्र, एसएससी परीक्षेचे प्रवेश पत्र( रिसीट)यापैकी एक प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याचबरोबर आपला स्वतःचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी आवश्यक आहे.

प्रश्न 8) पूर्वतयारी परीक्षा कोणकोणत्या माध्यमातून ( भाषेमध्ये) देता येते?

 उत्तर- ही परीक्षा आपल्याला इंग्रजी, हिंदी, मराठी आणि उर्दू माध्यमातून देता येईल.

प्रश्न 9)  परीक्षा कोठे देता येईल?

  उत्तर-   पूर्वतयारी परीक्षा हे आपल्या जवळ  असणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रावर देता येईल ,तसेच त्या बाबतचे आवश्यक माहिती या अभ्यास केंद्रावर प्राप्त होईल.

  या पोस्टमध्ये काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न केला आहे, याशिवाय आपले  आणखी काही प्रश्न असतील तर ते प्रश्न खालील कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा त्याची उत्तरे देण्याचा मी नक्की प्रयत्न करीन.

 धन्यवाद

Post a Comment

0 Comments