Socialize

Preparatory Exam 2020

Preparatory Exam May 2020

पूर्वतयारी परीक्षा २०२० 

             यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नशिक मार्फत पूर्वतयारी परीक्षा घेतली जाते. ज्या विद्यार्थ्यांना आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करता आले नाही पण त्यांना शिकण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यासाठी या परीक्षेचे आयोजन केले जाते. ही परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना पदवीसाठी प्रवेश घेता येईल.

Online फॉर्म भरण्याचे वेळापत्रक 

प्रवेश सुरुवात तारीख १ जानेवारी ते २०२० फेब्रुवारी २०२० 

प्रवेश पात्रता  

  1. प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराचे वय ३१ डिसेंबर रोजी १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
  2. मराठी व इंग्रजी लेखन-वाचन करता येणे आवश्यक.
य दोन अटी पूर्ण करणारी कोणीही व्यक्ती या परीक्षेला बसू शकते.

आवश्यक कागदपत्रे 

खालील पैकी कोणत्याही एका दाखल्याची प्रमाणित सत्य प्रत आवश्यक.
  1.  शाळा सोडल्याचा दाखला 
  2. जन्म नोंदीचा दाखला 
  3. कॉलेजचा बोनाफाईड दाखला 
  4. एस.एस.सी. परीक्षा प्रमाणपत्र 

एकूण शुल्क ७५० रुपये 

कालावधी 

नोंदणी कालवधी प्रवेश घेताल्यापासून कमाल २ वर्षाचा आहे. या दोन वर्षात पूर्वतयारी यशस्वीरीत्या पूर्ण न केल्यास नव्याने प्रवेश घ्यावा लागतो.

मध्यम 

पूर्वतयारी शिक्षणक्रम इंग्रजी, मराठी आणि उर्दू माध्यमातून उपलब्ध आहे.

मूल्यमापन प्रक्रिया 

  1. १०० गुणांची अंतिम परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येते. यात ५० गुणांचे वस्तुनिष्ठ व ५० गुणांचे वर्णनात्मक प्रश्न असतात.
  2. या परीक्षेचा कालावधी ३ तासांचा असतो.
  3. विद्यार्थ्यास त्याने निवडलेल्या केंद्रावरच परीक्षा देता येईल.
  4. शिक्षणक्रम उत्तीर्ण होण्यासाठी ४०%गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करुन माहिती पुस्तिका डाउनलोड करा.

माहितीपुस्तिका 

एखादी सूचना, प्रश्न असल्यास कमेंट आवश्य करा. 

Thanks.
Post a Comment

0 Comments